मराठीचिये नगरी

213.5K posts

मराठीचिये नगरी banner
मराठीचिये नगरी

मराठीचिये नगरी

@MarathiRT

तारांमध्ये बारा राशी सप्तवारामध्ये रविससी यादिमिचेआं भासांमध्ये.. मराठिया.. #मराठी #मराठीदिन #महाराष्ट्रदिन #MahaCovid #MahaPlasma #महाराज्य आणि बरंच काही..

Maharashtra, India Bergabung Ocak 2013
3K Mengikuti91.1K Pengikut
Tweet Disematkan
मराठीचिये नगरी
खूप खूप आभार सर..आपली साथ आणि आशीर्वाद असेच राहुद्या..माय मराठीच्या सेवेकामी आपण सर्वांनी कटिबद्ध राहून महाराष्ट्राचा, मराठी मातीचा आणि मराठी भाषेचा झेंडा सदैव फडकत ठेवू..🙏🏻🚩🇮🇳
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis

@MarathiRT धन्यवाद @MarathiRT परिवार ! आपण मराठी भाषेसाठी करत असलेले काम प्रशंसनीय आहे! शुभेच्छा !

MR
40
67
622
0
मराठीचिये नगरी
प्रत्येक त्रिकातील मधल्या मूलद्रव्याचे अणुभार हे उर्वरित दोन मूलद्रव्यांच्या अणुभारांच्या सरासरीच्या जवळपास असते त्या तीनही मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म समान असतात. ही संकल्पना आधुनिक आवर्त सारणीचा (Periodic Table) पाया ठरली.
मराठीचिये नगरी tweet media
MR
0
0
1
145
मराठीचिये नगरी
मूलद्रव्यांच्या शास्त्रशुद्ध वर्गीकरणाचा प्रथम प्रयत्न करणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ योहान वुल्फगँग डोबेरायनर यांचा आज स्मृतिदिन. त्यांनी 1829 मध्ये “डोबेरायनरचे त्रिक (Triads)” ही संकल्पना मांडली. या पद्धतीत त्यांनी काही मूलद्रव्यांचे तीन-तीनच्या गटांमध्ये वर्गीकरण केले.
मराठीचिये नगरी tweet mediaमराठीचिये नगरी tweet media
MR
1
0
10
480
मराठीचिये नगरी
मराठी कथालेखक व कादंबरीकार श्रीपाद नारायण पेंडसे यांचा आज स्मृतिदिन. ग्रामीण जीवनाचे सूक्ष्म निरीक्षण, मानवी स्वभावाचे वास्तव चित्रण आणि सामाजिक बदलांचे प्रभावी दर्शन घडवणारे समर्थ लेखक. 'गारंबीचा बापू, तुंबाडचे खोत, रथचक्र या त्यांच्या अजरामर साहित्यकृती विनम्र अभिवादन
मराठीचिये नगरी tweet media
MR
0
3
18
320
मराठीचिये नगरी me-retweet
The Atarangi
The Atarangi@Atarangi_Kp·
जय स्वाद, जय महाराष्ट्र! 🍽️ नागपूरच्या विक्रम आणि अजिंक्य गांधी या भावंडांनी MasterChef India – “Pride of India” मध्ये ऐतिहासिक विजय मिळवत ट्रॉफी पटकावली. जिद्द, परिश्रम आणि मराठी प्रतिभेचा हा अभिमानास्पद क्षण! महाराष्ट्राच्या कलेला आणि चवीला सलाम. 🙏🇮🇳
The Atarangi tweet media
MR
0
6
67
1.8K
मराठीचिये नगरी me-retweet
Vaibhav Shetkar
Vaibhav Shetkar@vaibhavshetkar·
कुडुंबी म्हणजे कन्नड कुणबी १६–१७ व्या शतकात गोवा–कोकणातून स्थलांतर कारण? पोर्तुगीज कर्नाटकात स्थायिक झाले पण ओळख मात्र तशीच ठेवली 💛 आजही कोंकणी बोली जपलेली 🗣️ आणि शिग्मो (होळी) सण तितक्याच जल्लोषात साजरा! करतात ते. इतिहास + संस्कृती + हट्टाने जपलेली परंपरा = कुलवाडी भूषण पाईक
MR
2
38
304
10.5K
मराठीचिये नगरी me-retweet
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh
वाचा: मराठी माणसाच्या रंगपंचमीवर परप्रांतीयांचे अतिक्रमण! शासनाने पाचव्या दिवशीच सुट्टी देण्याची मराठी एकीकरण समितीची मागणी महाराष्ट्राचा इतका मोठा सण बुडीत निघण्याची खंत समिती अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी व्यक्त केली. loksatta.com/vasaivirar/mah…
MR
5
58
273
2.7K
मराठीचिये नगरी me-retweet
varsha kide-kulkarni
varsha kide-kulkarni@KideKulkarni·
माझ्या 'काळीजफूल'या ललित लेखसंग्रहास सार्वजनिक वाचनालय कल्याण चा कै श्रीधर घारपुरे ललित साहित्य प्रथम पुरस्कार मसाप पुणे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या हस्ते स्वीकारताना मी.@MarathiBrain @MarathiRT @RetweetMarathi @bolibhasha @ marathi
MR
0
1
2
316
मराठीचिये नगरी me-retweet
varsha kide-kulkarni
varsha kide-kulkarni@KideKulkarni·
काळीजफूल या माझ्या ललित लेखसंग्रहास सार्वजनिक वाचनालय कल्याण मुंबई चा कै श्रीधर घारपुरे ललित साहित्य प्रथम पुरस्कार मसाप पुणे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या हस्ते स्वीकारताना मी.@MarathiBrain @MarathiRT @bolibhasha @TheMarathiPremi @MeMarathiNewss
varsha kide-kulkarni tweet mediavarsha kide-kulkarni tweet mediavarsha kide-kulkarni tweet mediavarsha kide-kulkarni tweet media
MR
1
1
4
437
मराठीचिये नगरी me-retweet
Anil Shidore अनिल शिदोरे
मराठी भाषेसाठी मी काय करू शकेन? १) मराठी भाषेसाठी काम करत असलेल्या एका तरी संस्थेबरोबर जोडून घेऊन तिथे कार्यकर्ता म्हणून काम करू शकतो, त्यांना फूल ना फूलाची पाकळी आर्थिक मदत देऊ शकतो. त्यांच्या कामात सहभागी होऊ शकतो. २) महिन्यात एक तरी मराठी पुस्तक विकत घेऊन वाचायचंच असा निश्चय करू शकतो. ३) दरवर्षी भरत असलेल्या साहित्य, नाट्य संमेलनांना उपस्थित राहू शकतो. (जरी तिथली नाटकं, तिथल्या कविता, तिथली भाषणं वाईट असली तरी, कारण आपण जात राहिलो की गुणवत्ताही सुधारत जाईल !) ४) माझ्या घराजवळच्या एका तरी शाळेत जाऊन महाराष्ट्र सरकारच्या नियमाप्रमाणे ती शाळा कुठल्याही बोर्डाची असली तरी तिथे सर्व इयत्तांना मराठी शिकवतात की नाही ते पाहू शकतो आणि शिकवत नसतील तर एक लेखी पत्र देऊन त्याची एक प्रत शिक्षणमंत्र्यांना आणि एक प्रत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देऊ शकतो. तिथल्या मराठी शिक्षणाची गुणवत्ताही तपासण्यासाठी जाणकारांना बरोबर नेऊ शकतो. ५) शाळेत किंवा महाविद्यालयात मराठी शिकवत असलेल्या शिक्षकांना भेटून त्यांचे आभार मानू शकतो, काही मदत लागली तर सांगा असं म्हणू शकतो आणि जमलं तर त्यांचा सत्कार करू शकतो. ६) जिथे सार्वजनिक आस्थापना आहे तिथे जर मराठी पाटी नसेल तर तिथल्या प्रमुखाला तिथली पाटी मराठीत असावी म्हणून एक लेखी पत्र देऊ शकतो आणि त्याच्या दोन प्रती काढून एक प्रत “दुकाने व आस्थापना” नियामक कार्यालयाला आणि एक प्रत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक शाखेकडे देऊ शकतो. ७) बॅंक, विमा किंवा तत्सम कार्यालयात मराठीचा वापर होत नसेल तर तिथेही त्यांच्याशी एकदा तोंडी बोलून, तरीही सुधारणा झाली नाही तर मग लेखी पत्र देऊन त्याची प्रत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे देऊ शकतो. (हे करताना “शासन निर्णय” जोडला तर उत्तम.) ८) माझ्या परिसरात मराठी पुस्तकांचं वाचनालय सुरू करू शकतो. त्या वाचनालयाला पुस्तकं भेट देऊ शकतो. मला सुरू करता येत नसेल तर निदान त्याचा सदस्य होऊ शकतो. ९) माझ्या परिसरात मराठी सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ शकतो, त्यात मुला-मुलींची अस्खलित मराठी बोलण्याची स्पर्धा घेऊ शकतो. १०) माझ्या भागातील लोकप्रतिनिधींना भेटून “तुम्ही जर मराठी भाषेचा मान ठेवला नाही तर तुम्हाला पुढच्या निवडणुकीत मत देणार नाही” असं सांगू शकतो. हे लेखीही देऊ शकतो. इतरांनीही तसं करावं असा प्रयत्न करू शकतो. ११) माझ्या भागातील लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांना भेटून, किंवा पत्र लिहून तुम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी अजून केंद्राकडून कुठलाही निधी नाही असं लेखी निवेदन देऊ शकतो. शकतो. सोबत आणखी १० जणांना घेऊन जाऊ शकतो. १२) एक तरी मराठी वृत्तपत्रं घरात घेऊ शकतो. वृत्तपत्रांची गुणवत्ता खराब असली तरी आपण घेत आहोत म्हटल्यावर त्यांनाही प्रोत्साहन मिळेल. १३) प्रत्येक ठिकाणी स्वाक्षरी आग्रहानं मराठीत करू शकतो. पूर्वी जर माझी सही बॅंकेत मराठी सोडून वेगळ्या भाषेत असेल तर ती बदलून घेऊ शकतो. धनादेश लिहिताना तो आग्रहानं मराठीतच लिहू शकतो. १४) एखाद्या इमारतीत, किंवा कार्यालयात जाताना बाहेर नोंदवहीत नोंद करताना ती नोंद मराठीतच करू शकतो. १५) माझ्या घरात लहान मुलं असतील तर रोज त्यांना मराठीत गोष्ट सांगू शकतो. त्यासाठी गोष्टींची पुस्तकं खरेदी करू शकतो. १६) सध्या अनेक इमारतींवर किंवा घरांवर लोक स्वत:च्या नावाची पाटी इंग्रजीत लावतात. नाव, आडनाव अस्सल मराठी असतं पण पाटी इंग्रजी असते. ती सगळी आपलीच मराठी माणसं आहेत. त्यांना नम्रपणे विनंती, आवाहन करू शकतो. ते लगेच ऐकणार नाहीत. पण, हळूहळू त्यांच्याशी न भांडता तुमचा आग्रह करत राहू शकतो. १७) महिन्यात एक तरी मराठी चित्रपट पहायचं ठरवू शकतो. त्या चित्रपटांची गुणवत्ता दर्जेदार नसली तरीही, कारण आपण चित्रपटगृहात मराठी माणसाचा पैसा मराठी चित्रपटामागे उभा करत राहिलो तरच गुणवत्ताही वाढत जाईल. १८) उपहारगृहात गेलो आणि तिथलं माहितीपुस्तक आणि दरपत्रक मराठीत नसेल तर मराठीचा आग्रह धरू शकतो. नसेल तर कुणालातरी मराठीत भाषांतर करून सांगायला सांगू शकतो. पुढच्या वेळी मराठीत ही पुस्तिका किंवा दरपत्रक नसेल तर मी पुन्हा येणार नाही असं नम्रपणे, हसतमुखानं सांगू शकतो. १९) सकाळी “गुड मॉर्निंग” किंवा सायंकाळी “गुड इव्हिनिंग” न म्हणता सुंदर आणि गोड मराठीत “सुप्रभात”, किंवा “शुभ-सकाळ” किंवा “शुभ-सायंकाळ” असं म्हणू शकतो. मी मराठी साठी खूप काही करू शकेन.. जय मराठी ! जय महाराष्ट्र !!
MR
12
139
457
12.2K
मराठीचिये नगरी me-retweet
Let's Read India
Let's Read India@LetsReadIndia·
चला,आज मराठी अधिकाधिक बोलूया,वाचूया, लिहूया आणि जपूया! मराठीचा मान वाढवूया,मराठीचा जयघोष करूया! जय महाराष्ट्र! जय मराठी! डिजिटल युगातही मराठीचा वापर वाढावा आणि तिचा वारसा पुढे जावा, हा या दिवसामागील मुख्य उद्देश आहे. तुम्हाला आवडणारी आणि सध्या वाचत असणारी मराठी पुस्तके कोणती आहेत? #LetsReadIndia📚📚📚 #मराठीभाषागौरवदिन @MarathiRT
Let's Read India tweet media
MR
5
12
39
1.2K
मराठीचिये नगरी me-retweet
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe@neelamgorhe·
दि. २७ जानेवारी २०२६ *मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनात उत्साहपूर्ण कार्यक्रम; "जावे विनोदाच्या गावा" विशेष सादरीकरण, "लोकसेवेचा लोकजागर"ग्रंथाचे प्रकाशन* *मराठीला ज्ञानभाषा म्हणून पुढे नेण्याचे आवाहन; मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती* *विनोद व अस्मिता यांचा संघर्ष होऊ नये, मराठीला ज्ञानभाषा बनवू" -@CMOMaharashtra देवेंद्र फडणवीस* *"माय मराठीचं वैभव वाढवूया, सर्वांनी एकत्र प्रयत्न करूया" - उपमुख्यमंत्री @mieknathshinde *मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी सरकार कटिबद्ध - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार* *राज्य सरकारचा सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मराठीला अभिजात दर्जा - विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* *मराठी भाषेचे संरक्षण सर्वांची जबाबदारी; शिक्षण-तंत्रज्ञानात मराठीला प्राधान्य देणार - विधानसभा अध्यक्ष@RahulN_Office मुंबई.दि.२७:कविश्रेष्ठ कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होणारा मराठी भाषा गौरव दिन विधान भवनात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे आयोजित "जावे विनोदाच्या गावा"या विशेष कार्यक्रमात अभिजात मराठी साहित्यातील विनोदी साहित्याचे अभिवाचन, संवाद आणि सांस्कृतिक सादरीकरण झाले. याचवेळी वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे संपादित "लोकसेवेचा लोकजागर" या ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधान परिषद सभापती प्रा.@Prof_RamShinde विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, संसदीय कार्यमंत्री @ChDadaPatil मराठी भाषा मंत्री @samant_uday , सांस्कृतिक मंत्री @ShelarAshish , विधिमंडळ मराठी भाषा समिती प्रमुख आशुतोष काळे आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मराठी भाषा ही ज्ञानभाषा म्हणून पुढे यायला हवी. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रमाण भाषेचे महत्त्व शिकवले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिजात दर्जा देऊन राजाश्रय दिला. भाषेचा गोडवा टिकवायला हवा आणि तिचे साहित्य लोकांपर्यंत पोहोचवायला हवे. लोककला आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठी जिवंत ठेवायला हवी." उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले, "मराठीला हजारो वर्षांची परंपरा आहे. आचार्य अत्रे आणि पू. ल. देशपांडे हे विनोदाचे दोन शिखर आहेत. खान्देशी, कोंकणी, अहिरणी या सर्व मराठीच्या बहिणी आहेत. अभिजात दर्जा टिकवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. तंत्रज्ञानाच्या काळातही माय मराठीचे वैभव वाढवण्यासाठी एकत्र प्रयत्न करूया." उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी राज्य शासनाच्या विविध उपक्रमांचा उल्लेख केला. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वागतपर भाषणात राजकारणात विनोदाच्या मर्यादांचा मिश्किल उल्लेख केला. तसेच याच विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मराठी भाषा सर्व शाळांमध्ये अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी देखील व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, मंत्री उदय सामंत यांसह राज्यातील अनेक खासदारांनी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा केला आणि पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. याबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी आभार मानले व मराठीसाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तंत्रज्ञान युगातही मराठी शिक्षण आणि जतनाची जबाबदारी अधोरेखित केली. कार्यक्रमाची सुरुवात ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या गीताने झाली. पू. ल. देशपांडेंच्या ‘माझा शत्रूपक्ष’ चे ऋषिकेश जोशी यांनी, जयवंत दळवींच्या ‘जगी हा खास वेड्यांचा पसारा’ चे केदार शिंदे यांनी अभिवाचन केले. विंदा करंदीकर यांच्या निवडक कवितांचे वाचनही झाले. "आचार्य अत्रे व पु. ल. देशपांडे : विनोदाची दोन शिखरे" या विषयावर मिलिंद जोशी यांनी संवाद साधला. लोकगीतांचे सादरीकरणही झाले. कार्यक्रमाची संकल्पना उत्तरा मोने यांची होती, तर सूत्रसंचालन धनश्री दामले यांनी केले. हा कार्यक्रम मराठी भाषेच्या सांस्कृतिक वैभवाला उजागर करणारा ठरला असून, उपस्थित मान्यवरांनी मराठीच्या संवर्धनासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. @DrSEShinde @MahaDGIPR @lokmat @mataonline @LoksattaLive @SakalMediaNews @TV9Marathi @abpmajhatv @zee24taasnews @ddsahyadrinews @airnews_mumbai @RetweetMarathi @Shivsenaofc @pudharionline @navshaktiweb @LokshahiMarathi @rautvin @ShrimantManey @TawdeVinod @ANI --
Dr Neelam Latika Diwakar Gorhe tweet mediaDr Neelam Latika Diwakar Gorhe tweet media
MR
0
4
7
447
मराठीचिये नगरी
माझी माय सरसोती.. मले शिकविते बोली.. #मराठीदिन #मराठीभाषादिन #मराठीराजभाषादिन #मराठीभाषागौरवदिन #मायमराठी #मराठीप्रथम
मराठीचिये नगरी tweet media
MR
1
9
39
1K
मराठीचिये नगरी
मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार व समीक्षक 'विष्णु वामन शिरवाडकर' तथा #कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस. #मराठीदिन #मराठीभाषादिवस #मराठीप्रथम
मराठीचिये नगरी tweet media
MR
2
10
51
829
मराठीचिये नगरी
निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू। अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंतयोगी।। अष्टपैलू, अष्टावधानी, जाणता राजा, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजे भोसले यांची आज जयंती! राजं, मुजरा!🙏 #शिवजयंती
मराठीचिये नगरी tweet media
MR
0
8
56
1.7K
मराठीचिये नगरी
"शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात" छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र, एक अतूट असं नातं. या नात्याच्या उत्सवाचा दिवस तो म्हणजे हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. शिवनेरी गडावर आज १६३० साली एक तेजस्वी पुत्र जिजाबाईंच्या पोटी जन्माला आला. #शिवजयंती
मराठीचिये नगरी tweet media
MR
0
14
82
2K
मराठीचिये नगरी
प्रतिपश्चन्द्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता । शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।। प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी, विश्वाने वंदिलेली, शहाजीपुत्र शिवाची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे. #शिवजयंती
मराठीचिये नगरी tweet media
MR
1
15
113
2.2K
मराठीचिये नगरी me-retweet
Prafulla Wankhede 🇮🇳
Prafulla Wankhede 🇮🇳@wankhedeprafull·
कॅरिकेचर्स/कार्टून्स नक्की कसे काढायचे? त्यासाठी आयपॅडचा प्रभावी वापर कसा करायचा? कार्टून काढायची प्रोसेस कशी असते? या विषयाचं वर्षभराचं ट्रेनिंग मॉड्यूल घेऊन आपला आलोक @caricatured पुण्यात वर्कशॅाप घेतोय. हास्य, विनोदबुद्धी आणि सर्वात महत्वाचं सरकॅझम हे आलोकचे फार चांगले आणि स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत. पुणेकरांनी या नव्या प्रयोगाचे जोरदार स्वागत करावे ही मनापासूनची इच्छा तसेच शुभेच्छाही!
Prafulla Wankhede 🇮🇳 tweet media
MR
5
32
143
7.5K
मराठीचिये नगरी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांचा गंभीर विमान अपघात...दुर्दैवी बातमी...
मराठीचिये नगरी tweet media
MR
1
1
29
2.8K
मराठीचिये नगरी me-retweet
Vaibhav Shetkar
Vaibhav Shetkar@vaibhavshetkar·
पद्मश्री भिकल्या धिंडा
MR
2
48
246
5.8K