District Information Office, Kolhapur

19.2K posts

District Information Office, Kolhapur banner
District Information Office, Kolhapur

District Information Office, Kolhapur

@Info_Kolhapur

Official X account of District Information Office, #KOLHAPUR, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra. @MahaDGIPR

Kolhapur, India Katılım Eylül 2012
119 Takip Edilen12.5K Takipçiler
District Information Office, Kolhapur retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
‘न्यूज 18 इंडिया’ या वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्र Weekly’ हा कार्यक्रम… #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek #DGIPR
MR
0
1
2
202
District Information Office, Kolhapur retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
#जालना नजीक समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी असून त्यांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक मदत राज्य शासनातर्फे देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या घटनेत जे प्रवासी जखमी झाले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून स्थानिक प्रशासन यासंदर्भात समन्वय साधून आहेत. तसेच जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक स्वतः तेथे असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. @Dev_Fadnavis
MR
0
3
10
922
District Information Office, Kolhapur retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
📍नवी दिल्ली साहित्य अकादमीतर्फे २०२५ या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या युवा साहित्य पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मराठी भाषेसाठी प्रदीप कोकरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानचिन्ह, शाल आणि पन्नास हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. नवी दिल्लीतील श्रीराम सेंटरमध्ये झालेल्या विशेष समारंभात साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते श्री. कोकरे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध हिंदी साहित्यिक सूर्यप्रसाद दीक्षित, अकादमीच्या उपाध्यक्षा कुमुद शर्मा, सचिव पल्लवी होळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. देशातील मान्यताप्राप्त २३ भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींना यंदाचे साहित्य अकादमी युवा पुरस्कार जाहीर झाले. त्यात मराठी भाषेसाठी प्रदीप कोकरे यांना 'खोल खोल दुष्काळ डोळे' या रचनेसाठी हा सन्मान जाहीर झाला होता. #साहित्यअकादमी
MAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet media
MR
0
3
6
325
District Information Office, Kolhapur retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
#खरीपहंगाम २०२६ करिता युरिया व डीएपी खतांचा आरक्षित साठा एप्रिल व मे महिन्यात तयार ठेवण्याचे काटेकोर नियोजन कृषी विभागाने करावे. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत खतांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणत्याही कंपनीने किंवा विक्रेत्याने खतांसोबत इतर उत्पादने घेण्याची सक्ती शेतकऱ्यांना करू नये, असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील खतांची उपलब्धता आणि नियोजनाचा आढावा घेण्यासाठी कृषी मंत्री श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, संचालक कृषी सुनिल सी. बोरकर यासह विविध खत कंपन्याचे अधिकारी उपस्थित होते. @bharanemamaNCP
MAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet media
MR
0
4
15
806
District Information Office, Kolhapur retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
‘CNN News 18’ या वृत्तवाहिनीवरील ‘अजेंडा महाराष्ट्र (Agenda Maharashtra)’ कार्यक्रम… #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek #DGIPR
हिन्दी
0
3
3
246
District Information Office, Kolhapur retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
#मंत्रिमंडळनिर्णय (संक्षिप्त) #CabinetDecisions
MAHARASHTRA DGIPR tweet media
हिन्दी
0
10
9
532
District Information Office, Kolhapur
#कोल्हापूर: 'श्री जोतिबाच्या नावानं चांगभलं'च्या अखंड जयघोषात, गुलालाच्या न्हाऊन निघालेल्या वातावरणात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथे जोतिबा चैत्र यात्रेचा मुख्य पालखी सोहळा आज अमाप उत्साहात साजरा करण्यात आला. @MahaDGIPR @CollectorKolha1
District Information Office, Kolhapur tweet mediaDistrict Information Office, Kolhapur tweet mediaDistrict Information Office, Kolhapur tweet mediaDistrict Information Office, Kolhapur tweet media
MR
0
2
2
67
District Information Office, Kolhapur retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने विविध सामाजिक घटकांसाठी प्रवास अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल करण्यात येत आहे. याच दिशेने पुढचे पाऊल म्हणून ‘RuPay On-The-Go’, एनसीएमसी (NCMC) सक्षम स्मार्ट कार्ड योजनेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले. यावेळी अमृतमहोत्सवी ज्येष्ठ नागरिक रमेश ढावरे, तसेच सवलतधारक महिला संगीता पालकर व वर्षा कांबळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते एनसीएमसी स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्यासह सर्व मंत्री व #एसटी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @PratapSarnaik @msrtcofficial
MAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet media
MR
0
12
25
1.2K
District Information Office, Kolhapur retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष ११ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ या कालावधीत साजरे करण्यात येत आहे. या द्विशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे कार्य, विचार पुढील पिढीपर्यंत प्रभावीपणे नेण्याची संधी असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यावर आधारित विविध कार्यक्रमांची वार्षिक दिनदर्शिका बनवून वर्षभर कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्याचे निर्देश बैठकीतदिले. क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे करण्यासाठी गठीत समितीमध्ये संलग्नित विभागाने किमान दोन ते तीन कार्यक्रमांचे आयोजन करावे. अशा प्रेरक कार्यक्रमांचे नियोजन १५ एप्रिल पर्यंत देण्यात यावे. महात्मा जोतिराव फुले यांचे मूळ गाव खानवडी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील त्यांच्या स्मृती जपणाऱ्या जिल्हा परिषद शाळेचा कायापालट करण्यात आला आहे. या द्विशताब्दी जयंती वर्षाची सुरुवात ११ एप्रिल रोजी सीबीएससी शिक्षण, आधुनिक सुविधांनी युक्त खानवडी जिल्हा परिषद शाळेच्या लोकार्पण कार्यक्रमाने करावी, असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मंत्रालयात आयोजित या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, इमाव बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आदी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @ChhaganCBhujbal @ShelarAshish @SanjayShirsat77 @save_atul @dadajibhuse @iAditiTatkare
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
0
17
19
865
District Information Office, Kolhapur retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
‘झी न्यूज’ या वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्र एक कदम आगे’ हा कार्यक्रम… #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek #DGIPR
MR
0
12
5
566
District Information Office, Kolhapur retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
‘रिपब्लिक भारत’ या वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्र की विकासगाथा’ हा कार्यक्रम… #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek #DGIPR
MR
0
13
5
578
District Information Office, Kolhapur retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
‘मुंबई तक’ या वृत्तवाहिनीवरील ‘महा VISION’ हा विशेष कार्यक्रम… #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek #DGIPR
MR
0
11
5
657
District Information Office, Kolhapur retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
देशाच्या प्रगतीत जैन समाजाचे योगदान मोलाचे आहे. गोसेवा आणि सेवाकार्यातही जैन समाज अग्रेसर आहे. भगवान महावीर यांनी दाखवलेला मार्ग मानवतेच्या कल्याणाचा असून या विचारांतूनच विश्व कल्याण साधले जाऊ शकते. भगवान महावीरांनी शांतीचा आणि सेवाभावाचा मार्ग दाखविला. सेवाकार्यात नेहमीच अग्रेसर राहून जैन समाजाने आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकल जैन समाज यांच्या वतीने आयोजित भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवात केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अरहम प्राणी रुग्णालयाच्या संकल्पनेचे उद्घाटन तसेच मुंबईतील डबेवाले यांना १०८ ई बाईक्सचे वितरण करण्यात आले. दिव्यांगांना ५० ई ट्रायसिकलचे वितरणही करण्यात आले. बोरीवली पश्चिम येथील कोरा केंद्र मैदान येथे झालेल्या या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, महापौर रितू तावडे, आमदार पराग शहा, अमित साटम, संजय उपाध्याय, गुरुदेव नम्र मुनी तसेच मान्यवर उपस्थित होते. @Dev_Fadnavis @mieknathshinde @MPLodha
MAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet media
MR
1
9
17
1.1K
District Information Office, Kolhapur retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
‘इंडिया टीव्ही’ या वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्र Top 10’ हा विशेष कार्यक्रम… #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek #DGIPR
MR
0
13
0
570
District Information Office, Kolhapur retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरील ‘साप्ताहिक महाराष्ट्र’ विशेष कार्यक्रम… #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek #DGIPR
MR
0
12
2
568
District Information Office, Kolhapur retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
‘टाईम्स नाऊ नवभारत’ या वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्र ३६०’ कार्यक्रम… #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek #DGIPR
MR
0
10
1
467
District Information Office, Kolhapur
महाराष्ट्र, कर्नाटकसह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी येथे चैत्र यात्रेचा मुख्य सोहळा अत्यंत उत्साहात सुरू झाला. या मंगलप्रसंगी राज्याचे पर्यटन मंत्री @shambhurajdesai यांच्या हस्ते मानाच्या सासनकाठ्यांचे विधीवत पूजन करण्यात आले. @MahaDGIPR
District Information Office, Kolhapur tweet mediaDistrict Information Office, Kolhapur tweet mediaDistrict Information Office, Kolhapur tweet mediaDistrict Information Office, Kolhapur tweet media
MR
0
2
3
97
District Information Office, Kolhapur
🙏 चैत्र पौर्णिमा जोतिबा यात्रा २०२६ 🙏 'दख्खनचा राजा' श्री जोतिबाच्या यात्रेनिमित्त वाडी रत्नागिरी येथे येणाऱ्या सर्व भाविकांचे कोल्हापूर जिल्हा प्रशासनातर्फे सहर्ष स्वागत! यात्रा शांततेत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा #JyotibaYatra2026 #Kolhapur
District Information Office, Kolhapur tweet media
MR
0
1
4
124
District Information Office, Kolhapur retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
‘NDTV मराठी’ या वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्रनामा’ विशेष कार्यक्रम… #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek #DGIPR
MR
0
12
1
589