
#पुणे अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे.... पुणे शहरातील विविध सह दुय्यम निबंधक कार्यालयात बोगस काम करण्यासाठी अनिल गायकवाड यांची तात्पुरती नेमणूक केली जायची आणि काम झालं की त्यांना बाजूला केलं जायचं. कारण अनिल गायकवाड हे पात्र सह दुय्यम निबंधक नसून ते वरिष्ठ लिपिक आहेत. वरिष्ठ लिपिक असताना त्यांना जाणीवपूर्वक सह दुय्यम निबंधक पदाचा पदभार दिला जात होता. अनिल गायकवाड यांनी अनेक बोगस दस्त नोंदणी करुन सर्वसामान्य नागरिकांना देशोधडीला लावले आहे. तसेच यातून त्यांनी करोडो रुपयांची संपत्ती जमवली आहे. अनिल गायकवाड यांची ठरवून नेमणूक करण्यात जिल्हा दुय्यम निबंधक यांचा तसेच इतर काही अधिकाऱ्यांचा हात असण्याची शक्यता आहे. वरिष्ठांच्या मर्जी शिवाय अनिल गायकवाड हे असं धाडस करु शकत नाहीत. तसेच वरिष्ठांच्या आदेशानुसारच त्यांची हवेलीच्या विविध सह दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये सह दुय्यम निबंधक म्हणून नेमणूक करण्यात येत होती. अनिल गायकवाड,काही वरिष्ठ अधिकारी, एजंट, ठराविक वकील अशी सर्वांची मिळून बोगस काम करणारी ही टोळी आहे. संघटीतपणे कट रचून कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता हडप करण्याचा त्यांचा धंदा आहे. या प्रकरणी मी सातत्याने सखोल चौकशी करण्याची मागणी करत आहे. सध्या अनिल गायकवाड यांना जेडीआर कार्यालयात बसविण्यात आले म्हणजे कारवाई झाली असं होत नाही. शासनाने या प्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी समिती नेमणे आवश्यक आहे. प्रकरण अत्यंत गंभीर आहे. तसेच अनिल गायकवाड यांना तातडीने निलंबित करण्यात यावे. अनिल गायकवाड यांना निलंबित केल्याशिवाय चौकशी वस्तुनिष्ठ व निष्पक्ष होणार नाही. तसेच अनिल गायकवाड यांनी दरम्यानच्या काळात हवेलीच्या ज्या-ज्या सह दुय्यम निबंधक कार्यालयात काम केले तेथील सीसीटीव्ही फुटेज तातडीने जप्त करण्यात यावे. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @mieknathshinde @cbawankule @maharevenue @Aaple_Sarkarr @PuneCityPolice @CPPuneCity @DGPMaharashtra @Info_Pune @InfoDivPune @MahaDGIPR @IGR_Maharashtra @IgrPune


























