Mahesh

368 posts

Mahesh banner
Mahesh

Mahesh

@M_J2688

State Tax Inspector (Government of Maharashtra) tweets and rts are personal

Ahmednagar, Maharashtra, India Katılım Ocak 2014
1.4K Takip Edilen1.3K Takipçiler
Mahesh retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
'आशाताई' -दि लास्ट एम्परर ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचं निधन झालं. मी माझ्या एक दोन भाषणांमध्ये, आणि पुढे एकदा आशाताईंशी झालेल्या संवादात म्हणलं होतं की, लतादीदी आणि तुम्ही म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील, लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो आहात. लिओनार्दो द विंचीच्या कामाकडे बघताना त्यातील परफेक्शन, कमालीचा आखीव रेखीव पणा, जबरदस्त ठहराव आणि एक सर्रकन जाणवणारी आध्यात्मिक अनुभूती जाणवत राहते. हे सगळं दीदींच्या गाण्यात जाणवत राहतं. सगळं कसं परफेक्ट, आदर्शवत वाटत राहतं.  तर मायकलॅन्जलोच्या कामात नजाकत आहे, आवेग आहे, लडिवाळपणा आणि बंडखोरी पण आहे. कधी कधी त्याची शिल्प त्या दगडातून बाहेर येण्यास आतुर आहेत असं वाटत राहतं.  तसंच आशाताईंच्या गाण्यांचं. त्यांच्या गाण्यात ओढ आहे, खेळकरपणा आहे, धिटाई आहे आणि माणूस म्हणल्यावर थोडा बेधडकपणा, झुगारून देण्याची तीव्र इच्छा असणारच , ते सगळं आशाताईंच्या गाण्यात जाणवत राहतं.  'गाणं हे माझं पॅशन आहे' किंवा 'ऍक्टिंग माझं पॅशन आहे' असं म्हणत स्वतःला कलाकार आणि कालांतराने ज्येष्ठ कलाकार इत्यादी म्हणून घेणारे हल्ली ढिगाने आढळतात.   असलं म्हणण्याची मुभा नियतीने आशाताईंना कधीच दिली नाही. वयाच्या १५व्या वर्षी स्वतःला आणि कुटुंबाला उभं करायचं आहे आणि त्यासाठी काय जमतंय तर निसर्गदत्त आवाजाची देणगी. या इतक्या भांडवलावर त्यांनी गाणं गायला सुरुवात केली. अजाणत्या वयात व्यक्तिगत आयुष्यात आशाताईंनी अफाट त्रास सहन केला. पण या त्रासाने किंवा दुःखाने त्यांच्या मनातला किंतुपरंतुवर मात केली आणि आयुष्यात जी धिटाई आली ती आवाजात आली.  मी वर म्हणल्याप्रमाणे लतादीदींचा आवाज म्हणजे परफेक्शन आणि कमालीचा ठहराव. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळं वातावरण भारावलेलं असताना असा आवाज हा त्या काळाचा आवाज वाटावा असा आवाज आहे. अशावेळेस स्वतःचा आवाज तयार करायचा, त्यासाठी आपल्या एक्सप्रेशनला साजेसं गाणं मिळेपर्यंत वाट पहायची यासाठी आशाताईंनी काय पेशन्स ठेवले असतील हे त्याच जाणोत.  'पिया तू अब तो आजा' मध्ये प्रियकराला थेट बेधडक आवाहन आहे. 'आईये मेहरबान' मध्ये लडिवाळपणा आहे, 'दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिए' मध्ये नजाकत आहे. 'दम मारो दम' मध्ये बंडखोरी आहे, सगळ्या चौकटी तोडून येण्याची तीव्र उर्मी आहे. याच आशाताई मराठी भावसंगीतात 'मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश' म्हणत युगायुगांचं वैराग्याचे प्रतीक शंकर चराचरात आहेत आणि लक्ष ठेवून आहेत हे आर्तपणे सांगतात. व्यक्तिगत आयुष्याच्या जवळपास प्रत्येक टप्प्यावर त्यांनी वादळं पहिली. तरीही आशाताई खचल्या नाहीत, दुःख हत्यार बनवलं नाही, कडवटपणा येऊ दिला नाही. दुःख हाताळायची त्यांनी कलाच जणू आत्मसात केली होती. म्हणूनच दीदी कायम दैवी वाटत राहिल्या तर आशाताई खूप मानवी वाटत राहिल्या. जसा दीदींचा सहवास मिळाला तसाच आशाताईंचा मिळाला. मी भाग्यवान आहे की ज्यांनी या देशाच्या अनेक दशकांच्या भावविश्वाला आकार दिला त्या दोन्ही बहिणींचा मला ओतप्रोत सहवास मिळाला. माझ्यासाठी आशाताईंकडे फक्त ज्येष्ठ गायिका म्हणून बघणं हे पुरेसं नाही तर तो गाण्यातून घडलेला अलौकिक प्रवास होता. तो चिरकाल तुमच्या माझ्यासोबत राहील, नवनवीन पदर उघडत राहील.  मी मागे माझ्या भाषणांत म्हणालो होतो की लता दीदी असतील, आशाताई असतील किंवा त्यांच्यासारखे इतर कलाकार असतील , ते जर नसते आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या भावविश्वात गुंतवून ठेवलं नसतं तर या देशांत कधीच अराजक आलं असतं  ! उत्तुंग काय असतं आणि ते कुठे बघायचं याचा मापदंड या लोकांनी  आपल्याला घालून दिला ! जसं लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो हे जरी वरवर परस्पर विरोधी वाटले तरी युरोपातील रेनेसाँस युगाला त्या दोघांनी वेगेवेगळ्या पद्धतीने आकार दिला. तसा आकार लतादीदी आणि आशाताईंनी भारतीय चित्रपट संगीताच्या  रेनेसाँस युगाला दिला. काही वर्षांपूर्वी दीदी गेल्या आणि आज आशाताई गेल्या. भारताच्या  रेनेसाँस युगाचा शेवटचा महत्वाचा घटक आज आपल्यातून गेला ! आशाताईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली. राज ठाकरे।
Raj Thackeray tweet mediaRaj Thackeray tweet media
MR
79
639
5.3K
115.7K
Aadhaar Office Western Region
आतां भुवन आधार पोर्टल वापरून तुमी तुमचें लागींचें #authorized #AadhaarSevaKendra वा #AadhaarCenter सोंपेपणान सोदूंक शकतात. भेट दिवपाक हांगा क्लिक करातः bhuvan-app3.nrsc.gov.in/aadhaar #BhuvanAadhaarPortal #EaseofLiving @UIDAI @GoI_MeitY @AshwiniVaishnaw @SecretaryMEITY @JitinPrasada
Aadhaar Office Western Region tweet media
MR
2
0
1
89
Mahesh retweetledi
Moin Shaikh
Moin Shaikh@moins1074·
आमचे आंदोलन (11 एप्रिल 2025) आणि वास्तव (TREAD) आंदोलनातल्या दोन प्रमुख मागण्या 1. राज्यसेवेमध्ये जे तांत्रिक आणि न्यायालयीन अडचण येऊ शकतात त्या दूर करणे आणि मगच मुख्य परीक्षा घेणे त्यासाठी मुख्य परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात यावी. 2. कम्बाईन 2024 च्या जागा वाढ कराव्या. (1/9)
MR
16
494
289
4.4K
Mahesh retweetledi
Votogram
Votogram@votogram_·
MPSC आणि विद्यार्थी.. खरंच वाटतंय कधी-कधी की ही परीक्षा नाय रे, Squid Game आहे — स्पर्धा परीक्षेची पोर.... संघर्ष करतायत, झगडतायत, आणि सिस्टीम बाहेरून फक्त बघतेय… कदाचित Entertain सुद्धा होतेय! आम्ही खूप लोकांना सांगितलं… अर्ज केले, मेल केले, ट्वीट केले, वाट पाहिली. पण आता थकलोय. 🙏 लोकशाहीचा चौथा स्तंभ — तुमच्यावरच शेवटची आशा आहे. @RahulAsks @ashish_jadhao @AbhijitKaran25 @_prashantkadam @waglenikhil @sahiljoshii @GondaneDevesh
Votogram tweet mediaVotogram tweet media
MR
52
211
103
2.1K
Mahesh
Mahesh@M_J2688·
@Abhya__ अभिनंदन 💐💐
हिन्दी
0
0
0
128
Mahesh retweetledi
Abhimanyu Pawar
Abhimanyu Pawar@AbhiPawarBJP·
आज राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री @Dev_Fadnavis जी यांच्याकडे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या पदसंख्येत वाढ करण्याची मागणी केली. सध्या या जाहिरातीत 457 पदांचा समावेश असून राज्यसेवेच्या इतिहासातील सर्वात मोठी क्रमांक 2 ची जाहिरात आहे. तरीही वस्तुनिष्ठ पद्धतीने राज्यसेवेची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी ही अखेरची संधी असल्याने पदसंख्येत वाढ व्हावी यासाठी पाठपुरावा केला. पदांच्या वाढीबाबत आजरोजी ठोस काही सांगता येत नसले तरी पूर्व परीक्षेच्या निकालापर्यंत माझा प्रामाणिक प्रयत्न सुरु राहील. यासोबतच राज्यसेवा 2022 च्या परीक्षेत निवड झालेल्या 623 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देणेबाबत विनंती केली. याबाबत मा. देवेंद्रजी यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव यांना दिले आहेत. #mpsc
Abhimanyu Pawar tweet mediaAbhimanyu Pawar tweet media
MR
101
656
759
21.1K
Mahesh retweetledi
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
महाराष्ट्र राज्याचा श्वास असलेला महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागात नेमकं चाललय काय...? या विभागातील कर्मचारी संघटना,आज दिनांक 17 डिसेंबर 2024 बेमुदत धरणे आंदोलन का करत आहे...? काय प्रश्न आहेत या विभागातील कर्मचार्यांचे १. राज्यकर निरीक्षक ते राज्यकर अधिकारी पदोन्नती. राज्यकर निरीक्षक ते राज्यकर अधिकारी पदोन्नती बाबत संघटनेचे प्रशासनासोबत एक वर्षापासून पत्रव्यवहार,भेटीगाठी, चर्चा पण अंमलबजावणी झाली नाही २. प्रशासकीय व विनंती बदली विशेष राज्यकर आयुक्त यांनी आश्वासित दोन ते तीन दिवसांमध्ये कर सहायकांचे विनंती बदल्यांचे आदेश व पदोन्नतीच्या जागा वापरून लवकरात लवकर राज्यकर निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश करण्यात येतील फक्त आश्वासने दिली जातात. शिवाय याव्यतिरिक्त मागण्या १. १०:२०:३० कालबद्ध पदोन्नती. २. कर सहायक सेवाशर्ती ३. कर सहायक व राज्यकर निरीक्षक पदोन्नती सन २०२४ DPC ४. विभागाच्या पुनर्रचनेमधील ७९९ राज्यकर निरीक्षकांचा प्रलंबित प्रस्ताव. ५. Pending Seniority list & Open Female Seniotity 6. HBA order तात्काळ पारित व्हावी. 7. E way bill drive यामध्ये कर्मचाऱ्यांची गैरसोय/ संरक्षण व होणारा अन्याय व रात्री/ अपरात्री महिलांना ई वे बील ड्युटी देवू नये. 8. राज्यकर निरीक्षक यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताणतणाव 9. खामगाव, नाशिक, भाईंदर येथील ठराविक अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना होणारा त्रास. 10. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती बाबतीत केलेल्या पत्रव्यवहाराबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याबाबत तीव्र नाराज राज्यकर निरीक्षक ते राज्यकर अधिकारी पदोन्नती व विनंती व प्रशासकीय बदल्या याबाबत जोपर्यंत आदेश पारित होत नाही. तोपर्यंत संघटना आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहे. राज्याची आर्थिक घडी विस्कटू न देनार्या वस्तू व सेवा कर विभागातिल वरिष्ठांच्या मनमानी कारभारामुळे कर्मचाऱ्यांच्या जिवनाची घडि मात्र विस्कटतना दिसत आहे.याचाच परिणाम म्हणून वांरोवार अर्ज विनंत्या निवेदन देऊन हि कुंभकर्णा सारख्या झोपि गेलेल्या प्रशासना विरोधात याच विभागातील राज्य कर्मचारी संघटनेने जो बेमुदत धरणे आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे त्यास आमच समर्थन आहे राज्यातील विरोधी पक्ष म्हणून आम्ही कर्मचाऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागातील संघटना यांच्या मागण्या रास्त आहेत.शासन आणि प्रशासनाकडून फक्त आश्वासने दिली जातात.सरकारला व वस्तू व सेवा कर विभाग प्रशासनाला विनंती आहे आपण प्रामाणिकपणे आंदोलनकरत्यांचे प्रश्न सोडवावेत...
Dr.Jitendra Awhad tweet media
MR
65
131
344
10.7K
Mahesh
Mahesh@M_J2688·
@MilindPatekar1 @MahaHealthIEC मराठी, सह्याद्री, अवनी, अनघा, रेवती, इरा, अवीरा, सावी, अक्षता.
MR
1
0
0
28
Mahesh
Mahesh@M_J2688·
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी तयारी करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना उद्याच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा..!!
MR
0
0
17
579
Mahesh retweetledi
Nana Patole
Nana Patole@NANA_PATOLE·
मा. @mieknathshinde @maha_governor @CMOMaharashtra @ssaunik मेगाभरतीचा महाघोटाळा 👉 राज्यसेवा 2024 जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा असून देखील तुटपुंज्या जागा काढल्या. 35 संवर्गापैकी सर्व महत्वाचे संवर्ग चक्क गायब आहेत. मुलांना उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक, तहसीलदार, मुख्याधिकारी होण्याचा अधिकार नाही का? सतत 7 महिने पाठपुरावा केल्यानंतर मोजून 7 उपजिल्हाधिकारी पदे समाविष्ट केली. या 7 मध्ये OBC सहित NT-C,NT-D व इतर प्रवर्गासाठी शून्य जागा. 👉 संयुक्त अराजपत्रित गट - ब व गट - क साठी जाहिरात दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध केली. सरकारने मागणीपत्रक वेळेवर न पाठवल्यामुळे जाहिरात तब्बल 9 महिने उशिरा प्रसिद्ध झाली. त्यामुळे हजारो उमेदवारांचे वय उलटून गेले. परिणामी त्यांना परीक्षेचा अर्ज भरता येणार नाही. @Dev_Fadnavis महोदय, ह्या वय उलटून गेलेल्या उमेदवारांचं काय करणार आहात? त्यांच्या नुकसानाला फक्त आणि फक्त आपण जबाबदार आहात. PSI च्या तुटपुंज्या जागांचे मागणीपत्रक पाठवायला तब्बल 9 महिने उशीर करून काय साध्य केले? @AjitPawarSpeaks दादा STI साठी फक्त 206 जागांचे मागणीपत्रक पाठवले. त्यातही ST category साठी चक्क शून्य जागा??? हाच का आपला सामाजिक न्याय??? 👉 जलसंपदा विभाग जाहिरात का प्रसिद्ध झाली नाही? 👉 BMC सहित इतर मनपा जाहिरात कुठे हरवल्या आहेत??? 👉 1000 रुपये फीच्या नावाखाली लुटले, अर्ज भरून घेतले तरी कित्येक परीक्षेच्या तारखा अद्याप जाहीर केल्या नाहीत. आचारसंहिता लागणार आहे माहित असतानाही या गोष्टी का विचारात घेतल्या नाहीत? 👉 ज्या परीक्षा घेतल्या त्यांचे निकाल जाहीर केलेले नाहीत. 👉 ज्यांचे निकाल जाहीर केले त्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. 👉 प्रलंबित शिक्षक भरतीच्या दिलेल्या आश्वासांचे काय झालं? पाळणार आहेत की नाही? शिक्षणसेवकांच्या समस्यांबाबत काही निर्णय घेणार आहेत की नाही? 👉 आम्ही यापूर्वी वेळोवेळी ह्या गोरगरीब उमेदवारांसाठी मागणी केली आहेच. सरकार संवेदनशील नाहीच. आपल्याकडे काही तास उरले आहेत. अजूनही सांगतोय ह्या सर्वांना न्याय द्या. 👉 #MPSC सहित सर्व स्पर्धा परीक्षा उमेदवारांना जबाबदारीने सांगतोय काँग्रेस पक्ष कायम आपल्या पाठीशी होता, आहे आणि असेल. जिथे जिथे ह्या महायुतीने तुमच्यावर अन्याय केला त्या प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्ष आपल्याला न्याय देण्यासाठी कटीबद्ध आहे.
MR
421
2.9K
1.9K
45.3K
Mahesh retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
#combine ची आलेली जाहिरात म्हणजे विद्यार्थ्यांनी संघटितपणे उभारलेल्या लढ्याचं यश असून विद्यार्थ्यांच्या लढ्यात सहभागी होता आले याचं समाधान आहे. जाहिरात आली असली तरी #PSI पदाच्या जागा मात्र पुरेशा नाहीत, आधी 441 जागांचे मागणीपत्रक असताना आता मात्र केवळ 216 जागांची जाहिरात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. तसेच ही जाहिरात तब्बल आठ महिने उशिरा आली आहे, परिणामी वयवाढीचा फटका बसून हजारो विद्यार्थी अपात्र ठरणार आहेत, त्यामुळे विधानमंडळात गृहमंत्री यांनी वयवाढीचा जीआर सर्व परीक्षांना लागू करण्याचे जे आश्वासन दिले होते ते #combine परीक्षेसंदर्भात देखील पाळून विद्यार्थ्याना दिलासा द्यावा. #sub_registrar पदांची एकही जागा आलेली नाही, त्या जागा समाविष्ट करण्यासंदर्भात देखील विचार करणे गरजेचे आहे. असो जागावाढ संदर्भात विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, दीड महिन्यांनी येणाऱ्या मविआ सरकारच्या पहिल्या निर्णयांमध्ये जागावाढ संदर्भातला निर्णय असेल. @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mpsc_office #MPSC | #PSI | #जागावाढ | #StudentsRights |
Rohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet media
Rohit Pawar@RRPSpeaks

आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, #Combine परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी आयोगाची कुठलीच हरकत नाही, केवळ आपल्या #गृहविभागाकडून #PSI पदाचे मागणीपत्रक आयोगाकडे गेले नसल्याने जाहिरात प्रसिद्ध होऊ शकलेली नाही. त्यामुळे आपल्या विभागाने तत्काळ रिक्त पदांचे मागणी पत्रक आयोगाला पाठवून सहकार्य केल्यास जाहिरात त्वरित प्रसिद्ध होऊ शकते. राज्यात PSI च्या जवळपास 2500 जागा रिक्त आहेत, त्यामुळे ज्याप्रमाणे 2012 मध्ये तत्कालीन गृहमंत्री स्व.आर आर आबांनी 1852 जागांची भरती केली होती, त्याचप्रमाणे यंदा आपण देखील मोठी जाहिरात प्रसिद्ध करावी तसेच राज्यसेवा जागावढीचा प्रश्न देखील मार्गी लावावा ही विनंती. असो, असो उशिरा का होईना आपण विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची #SERIOUS पणे दखल घेतली याबद्दल आपले आभार! @Dev_Fadnavis @mpsc_office #MPSC | #Rajyaseva |

MR
90
1K
827
18.6K
Mahesh retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
यंदाची राज्यसेवा परीक्षा #objective पद्धतीची शेवटची परीक्षा असल्याने यंदाच्या परीक्षेत सर्वच ३५ संवार्गांचा समावेश करून dysp, तहसीलदार यासारख्या सर्वच पदांची मोठी जाहिरात असावी, तसेच #combine परीक्षेची जाहिरात भरघोस पदांसह लवकरात लवकर म्हणजे आचारसंहितेच्या अगोदर काढावी, या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत. विद्यार्थी सरकारकडे यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करत असताना देखील सरकार मात्र हा विषय SERIOUS पणे घेत नाही, सरकारने विद्यार्थ्यांचा अंत न पाहता सकारात्मक विचार करून निर्णय घ्यावा अन्यथा लवकरच रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही. @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mpsc_office #MPSC | #Rajyaseva | #StudentsRights |
MR
127
1.1K
1.5K
41.2K
Mahesh retweetledi
Ashish 🖤
Ashish 🖤@ash35930·
@CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis माननिय मुख्यमंत्री साहेब १) राज्यसेवा परीक्षेच्या सर्व 35 संवर्गाच्या कमीत कमी 1000 जागांचे मागणीपत्र तात्काळ Mpsc कडे पाठवावे २) combine जाहिरात तात्काळ प्रसिध्द करून psi 1000 जागा सहित सर्वसमावेशक मागनिपत्र तात्काळ Mpsc कडे पाठवावे
Ashish 🖤 tweet media
MR
4
47
33
348
Mahesh retweetledi
Ajay
Ajay@amhiraigadkar·
🔴 ऑपरेशन पोलो - गोष्ट मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या शेवटच्या ४ दिवसांची !! स्वातंत्र्यानंतर हैदराबाद आणि एकदोन संस्थाने सोडली तर इतर संस्थाने भारतात विलीनीकरणाच्या करारानुसार सहभागी झाली होती. हैदराबाद मात्र समजुतीने भारतात सामील होणे तर दूरच..उलट त्याच्या हालचाली वेगळा देश कसा निर्माण होईल त्यानं दिशेने होत होत्या. भारताला स्वातंत्र्या मिळण्याआधीच निजामाने दोन फर्माने काढून १५ ऑगस्ट १९४७ पासून हैदराबाद हा स्वतंत्र देश असेल हे जाहीर केले होते. पण निजामाला भारतापासून धोका वाटतं होता. आणि म्हणूनच निजामाला आपले लष्करी बळ वाढवणे गरजेचे वाटू लागले. १/n + 👇 #म #Live_Thread
Ajay tweet media
MR
25
378
2.2K
185.9K
Krishna Maheshwari
Krishna Maheshwari@krishnaeyee·
Drop your name I'll write in my handwriting💛
English
12.4K
468
11.5K
2.4M
UmEsh 🐱
UmEsh 🐱@im_umesh_27·
आणि आपली एक छोटीशी मदत हि कु.शिवश्रीला एक आनंदीमय जिवन देयील यासाठी आप-आपल्या परीने लवकरात-लवकर मदत करावी ही नम्र विनंती. 🙏🏻🙏🏻😊🙏🏻🙏🏻 फोन पे/गुगल पे नंबर विनोद काळे 8805334424 Read more: ketto.org/s?id=rm-911180
MR
6
7
13
910
UmEsh 🐱
UmEsh 🐱@im_umesh_27·
कु.शिवश्री विनोद काळे रा.वरवडे ता.माढा जि.सोलापूर वय २ वर्ष हिला ३ महिन्यापुर्वी Alpastic Anemia "अप्लास्टिक अनेमिया" हा आजार झाला आहे आणि मागील ३ महिन्यात पुणे येथे दवाखाना उपचार चालू असलेमुळे आर्थिक परिस्थिती हालाकिची झालेली आहे.
UmEsh 🐱 tweet media
MR
16
52
67
8.5K