
Nehal Patil
145 posts

Nehal Patil
@NehalPatil66012
Finance,Advisor,Environment Activist


📍नाशिक आज पंचवटी परिसरातील ७ एकर जागेत राबविण्यात आलेल्या हरित उपक्रमाची पाहणी केली. सुमारे २,००० वृक्षांच्या लागवडीमुळे हा परिसर खऱ्या अर्थाने नंदनवनात परिवर्तित होत आहे. नाशिक शहरात १५,००० वृक्ष लागवडीचा संकल्प आपण केला असून लावलेले प्रत्येक झाड जिवंत राहावे यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. योग्य निगा, पाणीपुरवठा व संवर्धनाच्या माध्यमातून ही झाडे भविष्यात शहराच्या पर्यावरणाचा कणा ठरणार आहे. #Nashik #GreenNashik #GirishMahajan

कुंभमेळा नव्हे, हा तर कमिशन मेळा! लाच घेताना पकडलेला सरकारी अधिकारीच सांगतोय की मंत्र्यापासून खालपर्यंत सगळ्यांचे कुंभमेळ्यातील कमिशन फिक्स आहे. खाऊन खाऊन पोट फुटायची वेळ आली तरी या सत्ताधाऱ्यांची खादाड वृत्ती काही कमी होईना.






Money has many names: In school, it’s fees. In business, investment. In work, salary. In shopping, price. In banking, loan. In travel, fare. In law, fine. In religion, donation. In government, tax. Same money… just different excuses to take it from you 😄!




लंदन में पान थूकने पर 2 भारतीयों पर लगा 3.44 लाख का जुर्माना ◆ एक स्थानीय कोर्ट ने दोनों पर करीब 3 लाख 44 हजार रुपये का जुर्माना लगाया है #LondonCourt | London | India News

एक पाऊल स्वच्छतेकडे, एक पाऊल उज्वल भविष्याकडे! आपल्या शहराला स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. कचरा कुंडीतच टाका आणि प्लॅस्टिकचा वापर टाळून पर्यावरणाचे रक्षण करा. #NMC #Nashik #SwachhNashik #NoPlastic #majhivasundhara

माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना, सस्नेह जय महाराष्ट्र, आपल्या पक्षाचा उद्या, ९ मार्च २०२६ ला २० वा वर्धापनदिन. मराठी माणूस आणि मराठी भाषा यांच्यासाठी आक्रमकपणे लढणाऱ्या पक्षाचा आणि एका विचाराचा हा वर्धापनदिन. या निमित्ताने पक्षाची सदस्य नोंदणी १० मार्च २०२६ पासून सुरु होत आहे. उद्या ९ मार्च ला मी सकाळी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून माझ्यापासून सदस्य नोंदणीची सुरुवात करत आहे. या रायगडाने महाराजांचं वास्तव्य अनुभवलंच पण 'शिवराज्याभिषेकाचा' साक्षीदार देखील हा किल्लाच. अशा पावन ठिकाणी जाऊन आपण आपली सदस्य नोंदणी सुरु करत आहोत. आपली सदस्य नोंदणी ही महाराष्ट्र सैनिकांपुरतीच मर्यादित नाही हे मुळात लक्षात घ्या. तुम्ही सदस्य नोंदणी कराच, पण ज्यांना ज्यांना महाराष्ट्राला आकार द्यायचा आहे, ज्यांना ज्यांना सद्य परिस्थितीबद्दल राग आहे अशा सगळ्यांना आपल्याला, आपल्या नवनिर्माणाच्या ध्यासासोबत जोडून घ्यायचं आहे. तुमच्यासकट जे जे नव्याने आपल्यासोबत जोडले जाणार आहेत, ते आपण सगळे महाराष्ट्राचे पाईक आहोत याचं भान तुम्हीही ठेवा आणि लोकांना पण द्या. सदस्य नोंदणी डिजिटल स्वरूपात पण करणार आहोत ज्याचा तपशील तुम्हाला १० मार्चला कळलेच, फक्त पक्षाच्या शाखांच्या बाहेर स्टॉल्स लावून चालणार नाही तर सर्व वर्दळीच्या ठिकाणी माझे महाराष्ट्र सैनिक दिसले पाहिजेत , उदा . मार्केट, शाळा , मंदिरं , कॅालेज , मैदानं , बागा वगैरे अशा गजबजलेल्या सर्व ठिकाणी आपली सदस्य नोंदणीची टेबल्स लागली पाहिजेत ! येणाऱ्या जाणाऱ्यांशी संवाद साधत त्यांना आपलंस करत ही सभासद नोंदणी करा. यासाठी तुम्हाला जी मदत लागेल ती आपले सर्व पदाधिकारी तसेच शहर अध्यक्ष, उप शहर अध्यक्ष, उपाध्यक्ष , सरचिटणीस आणि पक्षाच्या नेत्यांना कळवा ! तसे आदेश मी त्यांना दिले आहेत ! प्रश्न आकड्याचा नाहीये, तशीही आपली सदस्य नोंदणी ही कायम मोठीच होते. पण यावेळेस महाराष्ट्र म्हणून, मराठी म्हणून सामान्य मराठी माणसाची महाराष्ट्राचा पाईक होण्याची इच्छा किती तीव्र आहे आणि सरकार किती चुकीच्या पद्धतीने सर्व गोष्टी हाताळते आहे याचा राग सर्वांच्या मनात किती आहे हे देखील स्पष्ट होईल ! त्यामुळे जोरदार सदस्य नोंदणी होईल यासाठी पूर्ण कसोशीने प्रयत्न करा. तुम्हाला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा. बाकी १९ मार्चला गुढी पाडव्याला शिवतीर्थावर आपली भेट होईलच , आणि तुम्ही सर्व महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून याल त्यामुळे मला तुमच्या रूपात महाराष्ट्र दर्शन देखील घडेलंच ! स्वतःची तसेच आपल्या परिवाराची आणि महाराष्ट्राची काळजी घ्या ! धन्यवाद ! आपला नम्र राज ठाकरे

महाविकास आघाडी लोकसभेच्या वेळेला एक नंबरचा पक्ष होता विधानसभेला जेव्हा भारतीय जनता पार्टी मतदाना वाढवत होती त्यावेळेला हे झोपलेले होते विधानसभेच्या निकालाच्या अगोदरच्या दिवशी हे जिंकले म्हणून, यांची चर्चा की कोण कुठला मंत्रिपद वाटून घेणार यावर चर्चा चालू होती आणि इकडे पूर्ण निकाल भाजपने बदलून टाकला. अजून पण यांचे 32 खासदार आहेत पण यांची लढण्याची मानसिकता शून्य आहे २०२१-२२ जेव्हा सत्ता बदलली तेव्हा एक राज्यसभा जागा कारणीभुत होती असेल हरी तर देईल खाटल्यावरी या तत्त्वावर महाविकास आघाडीची पुढची वाटचाल चालू आहे संघर्ष करा रोडवर उत्तरा तलवारीला तलवार जोडण्याची भाषा करा एक ही प्रश्न घेऊन तुम्ही लढत नाही आहात

राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प हा विकसित महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊल टाकणारा आहे !! @Dev_Fadnavis #Budget2026 #Maharashtra
