

Priyanka Shendage
1.3K posts

@Pri4SDGs
Sustainability I Policy Advocacy I Climate Change Youth Advocacy Consultant @UNICEF Own views. Breaking status quo






















जलसंधारणाला प्रोत्साहन देण्यासाठी "वाय वेस्ट वायईडब्ल्यूएस"(Why Waste YEWS) ऍप्लिकेशन आणि डॅशबोर्डचे डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी येथे आज उद्घाटन केले. महाराष्ट्रातील दुष्काळाचा इतिहास पाहता पाण्याची बचत करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे. यानुषंगाने संतुलीत पर्यावरणासाठी "वाय वेस्ट वायईडब्ल्यूएस"(Why Waste YEWS) ऍप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. यामध्ये सहभागी होऊन महाराष्ट्र दुष्काळमुक्त आणि टँकरमुक्त करावा, असे आवाहन याप्रसंगी केले. याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी,उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर,उपसचिव अशोक मांडे,उपसचिव अजित बाविस्कर, युनिसेफ मुंबई कार्यक्रमाचे अधिकारी बालाजी व्हरकट, युनीसेफ मुंबई सल्लागार प्रियांका शेंडगे, श्रुती गणपत्ये,ग्रीन स्कीलिंग प्रकल्प अधिकारी स्नेहा गौर व संबंधित अधिकारी उपस्थित होते. @UNICEFIndia @MYCA_climate







