Rahul Pandule retweetledi

राज्य सरकारला न जुमानता ‘एनसीईआरटी’ने इयत्ता ८ वीच्या हिंदीच्या पुस्तकानंतर आता इंग्रजीच्या पुस्तकातूनही मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा हटवून मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं. शिंदे, होळकर, पेशवे, भोसले आणि बारा बलुतेदार व अठरापगड जातीतील मावळ्यांनी अटकेपार झेंडे रोवले, हा मराठ्यांच्या दैदिप्यमान पराक्रमाचा इतिहास पुसून टाकण्याचा डाव दिसतो. खऱ्या इतिहासाची तोडफोड करुन सोयीचा इतिहास पुढं आणण्याचा सपाटा काही घटकांकडून लावला जात असताना नकाशा हटवण्याचा निर्णय म्हणजे त्याच पठडीतला आणि महाराष्ट्र द्वेषाचा एक नमुना आहे. राज्य सरकारने तातडीने यात हस्तक्षेप करुन अशा प्रकारे एकतर्फी नकाशा हटवण्याच्या ‘एनसीईआरटी’च्या निर्णयाला तीव्र आक्षेप नोंदवावा. अन्यथा सरकारला महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेच्या संतापाचा सामना करावा लागेल, हे निश्चित.!
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
#MarathaHistory
#StopDistortingHistory
#RespectMaharashtra #NCERT

MR



























