माझी Mumbai, आपली BMC@mybmc
🔹बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी आज सकाळी पश्चिम उपनगरातील अंधेरी व विलेपार्ले या भागातील महानगरपालिकेच्या स्वच्छता चौक्या,कीटकनाशक विभागाच्या चौक्या, रस्ते दुरुस्ती व भांडार चौकी आणि परिरक्षण चौकी यांना भेट देऊन पाहणी केली.
🔹चौकीवरील स्वच्छता कर्मचाऱ्यांसमवेत संवाद साधत श्रीमती भिडे यांनी कामकाजाचे स्वरूप, वेळ आणि अडिअडचणी जाणून घेतल्या. स्वच्छता चौक्यासह परिरक्षण व कीटकनाशक विभागांच्या चौक्या सुस्थितीत व उत्तम सेवा सुविधासह कराव्यात, अशा सूचना श्रीमती भिडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
🔹परिरक्षण(Maintains) विभागात पुरेशा प्रमाणात मजूर उपलब्ध आहेत, मात्र परिरक्षण विभागाच्या कनिष्ठ अभियंता (JE) यांच्या देखरेखीमध्ये अपेक्षित काटेकोरपणा दिसून येत नाही.
🔹प्रशासकीय विभागाच्या सर्व सहाय्यक आयुक्तांनी (Assistant Commissioner) प्रत्येक परिरक्षण चौकीतील कर्मचारी संख्येचा आढावा घ्यावा. दगडी कडा (कर्ब स्टोन) बसविणे, पदपथ दुरुस्ती, रस्ते दुभाजक दुरुस्ती इत्यादी लहान-मोठी नियमित कामे शक्य तितकी महानगरपालिकेच्या मजुरांमार्फत (in-house labour) करून घ्यावीत व अशा नियमित देखभाल कामांसाठी कंत्राटदारांचा वापर टाळावा, असे निर्देश संबंधित सहायक अभियंता/दुय्यम अभियंता/कनिष्ठ अभियंता यांना द्यावेत, असे श्रीमती भिडे यांनी स्पष्ट केले.
🔹सहायक आयुक्त यांनी कार्यक्षेत्रातील चौक्यांना भेट देऊन सविस्तर क्षेत्रीय नियोजन तयार करावे. हे नियोजन टप्प्याटप्प्याने अंतर्गत मजूर व आवश्यकतेनुसार कंत्राटदारांच्या माध्यमातून राबवावे. जेणेकरून मुंबई महानगरातील रस्ते देखभाल कामांमध्ये सर्वत्र दृश्यमान(Visibility) सुधारणा दिसेल, असेही श्रीमती भिडे यांनी नमूद केले.
🔹श्रीमती भिडे यांनी अंधेरी रेल्वे स्थानकाजवळील घनकचरा व्यवस्थापन चौकी, विलेपार्ले (पश्चिम) टाटा कंपाऊंड येथील कीटकनाशक चौकी, विलेपार्ले (पश्चिम) बजाज मार्ग येथील परिरक्षण चौकी आदींचा समावेश आहे. तसेच इर्ला नाला, एसएनडीटी नाला आणि गजदरबंध उदंचन केंद्र यांना प्रत्यक्ष भेट देऊन पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतला.
🔹जुहू येथील इर्ला पर्जन्यजल उदंचन केंद्र हे पूर्ण क्षमतेने सातत्याने कार्यरत ठेवावे, जेणेकरून मिलन भूयारी मार्ग, कूपर रुग्णालय परिसर, विलेपार्ले रेल्वे स्थानक तसेच जुहू-विलेपार्ले विकास क्षेत्रातील नागरिकांना पूरस्थिती पासून मोठा दिलासा मिळेल. तसेच, जुहू समुद्रकिनाऱ्याकडे वाहून जाणारा घनकचरा व तरंगता कचरा रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे स्पष्ट निर्देश श्रीमती भिडे यांनी दिले.
🔹उपायुक्त (आयुक्त कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड, उपायुक्त (परिमंडळ-7) श्री. मनीष वळंजू सहाय्यक आयुक्त श्री. चक्रपाणी अल्ले आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
@AshwiniBhide