
DONALD DUCK
4.2K posts
















बदनामियों का दौर है, तो नाम भी होगा, हम चुप हैं अभी, पर हर जवाब भी होगा। आधी कॉलर पकडण्याच्या सुरसकथा सांगत काही ‘अडाणी’ स्वयंघोषीत वार्ताहराने आदित्य ठाकरेंची आणि मातोश्रीची बदनामी सुरू केली… आणि आता एका वाढदिवसाच्या कार्यक्रमातील उपस्थितीचं भांडवल केलं जातंय. त्या कार्यक्रमाला सर्व पक्षांचे प्रमुख नेते, राज्याचे मंत्री उपस्थित होते… पण टार्गेट मात्र केलं जातंय फक्त आदित्य ठाकरेंनाच. गेली दोन दिवस हा तमाशा सुरूच आहे, थांबायचं नावच घेत नाही. गॅस टंचाई, महिला सुरक्षितता, शेतकऱ्यांचे प्रश्न, गारपीटग्रस्त मदत, कोकणातील आंबा-काजू नुकसान भरपाई , जंगलतोड…हे सर्व महाराष्ट्राचे महत्त्वाचे प्रश्न खरंच संपले आहेत का? अत्यंत सुनियोजित पद्धतीने आदित्य साहेबांची मीडिया ट्रायल सुरू असल्याचं स्पष्ट दिसतंय. पण प्रश्न एकच , कुणाच्या सांगण्यावरून हा सगळा प्रकार राबवला जातोय? गेल्या ६० वर्षांत अनेक सेना तयार झाल्या, संपल्या, काळाच्या ओघात लुप्त झाल्या पण सर्व स्थित्यंतरांमध्ये टिकून राहिली ती शिवसेनाच. त्यामुळे ज्यांना वाटतं ही तडजोड आहे त्यांना एकच सांगेन, कधी कुणाशी कसं लढायचं हे शिवसेनेला पक्कं माहीत आहे. एक गोष्ट निश्चित सांगतो, आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या हिताशी तडजोड करणार नाहीत, ही काळ्या दगडावरची भगवी रेष.


















