विद्यार्थी हितासाठी सदैव तत्पर असणाऱ्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी PMC परीक्षा TCs ion सेंटर वरच व्हाव्यात हा विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल खूप खूप आभार🙏
@Dev_Fadnavis
सरकारने विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये!एकीकडे जाहिराती ७महिने उशिरा काढायच्या आणि दुसरीकडे वयोमर्यादेमुळे अपात्र विद्यार्थ्यांनी हक्क मागितले की त्यांच्यावर लाठ्या उचलायच्या,त्यांना ताब्यात घ्यायचे,हा कुठला न्याय?सरकारची चूक असताना त्याची शिक्षा विद्यार्थ्यांना का?
किती दिवस झाले पोरं नुसती धावाधाव करत होती, हातातली शेवटची संधी जातीये पाहून मनातून खचत होती,सगळ्या नेत्यांचे उंबरे झीजवले,सगळ्यांनी फक्त आश्वासने दिली, पण आज #मनोज_जरांगे_पाटील आले आणि पोरांमध्ये नवचैतन्य आणि आत्मविश्वास आलाय🔥🔥
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR #psiवयवाढ #MPSCआंदोलन
2/2 ठप्प झाली आहे. अशा परिस्थितीत MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा वेळेत होणार की समोर जाणार याबाबत उमेदवारांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
मा.आयोगाला विनंती आहे, कृपया राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या सद्यस्थितीबाबत स्पष्टीकरण द्यावे जेणेकरून उमेदवारांच्या मनातील संभ्रम दूर होऊ शकेल
1/2 MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेची सद्यस्थिती काय?
येत्या २८ सप्टेंबर रोजी MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे. हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे व मराठवाड्यातील आणि राज्यातील इतर भागातील सध्याची पूरस्थिती अत्यंत गंभीर आहे. अनेक गावे, शहरे पाण्याखाली असून वाहतूक व्यवस्थाही
🔴लक्षवेधी...
@mpsc_office@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
👉28 सप्टेंबरच्या राज्यसेवा परीक्षेचे परीक्षार्थी राज्यातील नैसर्गिक आपत्तीची आणि पाऊसाची परिस्तिथी बघता परीक्षा खरंच होईल का नाही याबाबत खूप संभ्रमात आहेत तरी तात्काळ नोटिफिकेशन प्रसिद्ध करून संभ्रम दूर करावा ही विनंती.
राज्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती मुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आपत्तीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचणे ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थी आपल्या तयारीनिशी परीक्षेला बसण्यास इच्छुक असले तरी प्रत्यक्ष परिस्थितीमुळे त्यांना संधी न मिळणे हे अत्यंत अन्यायकारक ठरेल. समान संधी मिळावी ही मराठवाड्यातील प्रत्येक विद्यार्थ्याची मूलभूत अपेक्षा आहे.
सद्यस्थितीत विद्यार्थ्यांची मानसिक अवस्था देखील तणावपूर्ण आहे. अशा बिकट परिस्थितीत परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. त्यामुळे आयोगाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा.
याबाबत सन्मा. उपमुख्यमंत्री ना. श्री. अजितदादा पवार साहेब यांना काल बोललो त्यांनी लगेच सचिवांना दुरध्वनी द्वारे सुचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री महोदय यांना लेखी पत्राद्वारे परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या भावना कळविल्या आहेत. शासन या बाबत सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे.
@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@mahancpspeaks@Dev_Fadnavis
२८ सप्टेंबर रोजी @Mpsc_Andolan परीक्षा आहे..सर्वपक्षीय नेत्यांनी परीक्षा पुढे ढकलावी विनंती केली आहे! कृपया आज निर्णय सांगावा..परीक्षार्थीना परीक्षा केंद्रावर पोहचायला वेळ लागतो, सध्या स्थिती काय आहे...थोडी पण संवेदनशीलता नाही का? #MPSC
सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मुख्यमंत्र्याकडे मागणी..!
महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामीण भागात अभ्यासाचे वातावरण पूर्णपणे खराब झाले असून अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.
28 सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा या कठीण परिस्थितीत विद्यार्थ्यांसाठी देणे शक्य नाही. गावा-गावात अभ्यास साहित्याचे नुकसान, वाचनालये बंद, वाहतूक विस्कळीत आणि प्रशासन बचाव कार्यात गुंतलेले असताना परीक्षेला अडचणी निर्माण होत आहेत.
त्यामुळे शासन व संबंधित अधिकाऱ्यांनी याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलावी, ही विनंती.
#पूरपरिस्थिती #अतिवृष्टी #राज्यसेवा_पूर्व_परीक्षा #postpond
#राजेश_विटेकर #पाथरी #mpscexam@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
🔶अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांनो तयारीत रहा,हाक देताच हजर व्हा.
28 sep रोजी नियोजित महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षा त्याच दिवशी घेण्यावर ठाम असलेल्या @mpsc_office ला
मला एकच सांगायचे आहे राज्यसेवा syllabus मधील decision making, disaster management, natural calamities यात स्वतः आयोग फक्त नापासच नाही तर negative marking मध्ये आहे.
फक्त #UPSC चा syllabus copy paste करून moral, ethics ,principle अंमलात आणता येत नसतात.
मा.मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब दिल्लीत जाऊन महाराष्ट्रासाठी मदत मागताना 31 जिल्ह्यापेक्षा अधिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसानीचा उल्लेख करताय व ज्यांची शेती,घर,जनावरे पुरात संपले त्याच हजारो मुलांना अतिसंकटात असताना परीक्षा द्यायला लावताय.
असंवेदनशील सरकार दुटप्पीपणा दाखवत निर्दयी बनलं आहे नक्कीच.
बरोबर ना ??
@maha_governor महोदय
कुठे आहात आपण ?
@CMOMaharashtra झोपले आहे काय ??
@mieknathshinde साहेब
@AjitPawarSpeaks दादा
आपण कधी मौन सोडणार???
🔶 मुलांनो आपण लढू तयार रहा.
आत्तापर्यंत अन्यायायाविरुद्ध माझ्यासोबत लढणारे माझे सर्व सहकारी, मित्र, निःस्वार्थीपणे मदत करणारे,व माझे सर्व #MPSC उमेदवार
तयारीत रहा
लढेंगे भी और जीतेंगे भी
@RahulGandhi@PawarSpeaks@NANA_PATOLE@Jayant_R_Patil@INCHarshsapkal@satejp@AbhiPawarBJP@vishwajeetkadam@OfficeofUT@OmRajenimbalkr@PuneCityPolice@CPPuneCity
पुणे मुंबईत मुसळधार पाऊस नाही, पण ग्रामीण भागात भयानक परिस्थिती आहे. पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
त्यामुळे Mpsc ची 28 सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. अशी बऱ्याच उमेदवारांची मागणी आहे. @mpsc_office ने तातडीने निर्णय घ्यावा.
शेतकऱ्यांना एकरी ३४०० रु मदत देऊन काहीही साध्य होणार नाही, शेतकऱ्याला हेक्टरी किमान ५० हजार मदत गरजेची आहे. यासाठी केंद्राकडून ज्याप्रमाणे पंजाबला मदत मिळाली त्याप्रमाणे महाराष्ट्राला देखील केंद्राच्या मदतीची गरज आहे. #NDRF प्रमाणे मदतीचे अधिकार असलेले देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब आज मुंबईत आले असून मुख्यमंत्री महोदय त्यांची भेट घेणार असतीलच, या भेटीत अतिवृष्टीने उध्वस्त झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची व्यथा मांडून महाराष्ट्रासाठी NDRF मधून किमान १५ ते २० हजार कोटी रुपयांची अतिरिक्त मदत मागवून घ्यावी.. ओला दुष्काळ आणि कर्जमाफीसाठी सुद्धा केंद्राच्या मदतीचा शब्द घ्यायला हवा.
@Dev_Fadnavis
#ओला_दुष्काळ
मराठवाडा, सोलापूर, अहिल्यानगर येथे आलेल्या पुरस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे अभ्यास साहित्य वाहून गेले, वाचनालये बंद आहेत व वाहतूक विस्कळीत झाली आहे. या सर्व परिस्थितीत २८ सप्टेंबर रोजीची MPSC राज्यसेवा परीक्षा देणे अनेक विद्यार्थ्यांसाठी अशक्यप्राय आहे. यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी. विद्यार्थांच्या हिताचा विचार करून राज्य सरकारने याची योग्य ती दखल घेऊन निर्णय घ्यावा ही विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
मराठवाडा व विदर्भासह राज्यातील अनेक भाग सध्या अतिवृष्टी आणि महापुराच्या विळख्यात आहे. हजारो कुटुंबे उध्वस्त झाली, शेतजमिनी वाहून गेल्या, घरे पाण्याखाली गेली. या अशा आपत्तीच्या काळात राज्यातील हजारो विद्यार्थी आपल्या कुटुंबासोबत संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत २८ सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा इतकी अत्यावश्यक का ठरवली जाते आहे, हा गंभीर प्रश्न आहे.
नुकतेच वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (DMER) यांनी पूरस्थिती लक्षात घेऊन आपली परीक्षा पुढे ढकलली. मग महाराष्ट्र लोकसेवा आयोग विद्यार्थ्यांच्या अडचणींकडे डोळेझाक का करत आहे? हवामान खात्याने २८ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या रेड अलर्ट कडे दुर्लक्ष करून परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणे आहे.
परीक्षा काही दिवस पुढे ढकलल्याने आयोगाचे काहीही नुकसान होणार नाही. मात्र या नैसर्गिक आपत्तीच्या काळात विद्यार्थ्यांना परीक्षेला बसणे शक्य नसेल, तर त्याचा परिणाम त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर होईल.
त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीचा आदर करत, त्यांच्या भविष्याचा विचार करायला हवा आणि २८ सप्टेंबर रोजीची राज्यसेवा पूर्व परीक्षा तातडीने पुढे ढकलावी.
@mpsc_office@CMOMaharashtra@MahaDGIPR@MahaChiefSec@Dev_Fadnavis#marathwadaflood#mpsc#marathwadafloods#mpscexam#Maharashtra#MaharashtraFloods
राज्यभरात विशेषतः मराठवाड्यात आणि माझ्या मतदारसंघात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिकदृष्ट्या मोठे नुकसान झाले आहे. वाचनालये बंद असून अभ्यासाच्या साहित्याचे देखील नुकसान झाले आहे. याखेरीज वाहतूक व्यवस्था देखील विस्कळीत झाली असून अनेक ठिकाणी वाहने देखील पोहचू शकत नाहीत अशी स्थिती आहे. याच परिस्थितीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवेची परीक्षा ही 28 सप्टेंबर रोजी होणार आहे. परंतु अद्यापही मराठवाड्यातील विध्यार्थांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचता येईल अशी शक्यता नाही. त्यामुळे ही परीक्षा काही काळासाठी पुढे ढकलावी आणि परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर ती घेण्यात यावी अशी विध्यार्थांची मागणी आहे. माझी मुख्यमंत्री महोदय आणि शासनाला अशी विनंती आहे कि, कृपया आपण या गंभीर परिस्थितीचा विचार करून परीक्षा पुढे ढकलण्याच्या संदर्भाने निर्णय घ्यावा...
@CMOMaharastra@Dev_fadanvis
MPSC मध्ये निवड झालेल्यामध्ये बरेच उमेदवार शेतकरी शेतमजूर कुटुंबातून येतात. जर हा कार्यक्रम रद्द करून तातडीने नियुक्त्या दिल्या, तर चांगला संदेश गेला असता.
पण सरकारला केवळ भव्य कार्यक्रमातच रस आहे, असे दिसत आहे.
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde