
Prasad Hande
2.3K posts
















तामिळनाडू विधानसभेच्या निकालात अभिनेता विजय यांचा टीव्हीके पक्ष सर्वात मोठा पक्ष बनला असला तरीही बहुमतासाठी त्यांना आणखी १० जागांची गरज आहे. विधानसभेत बहुमताचा ११८ गाठण्यासाठी तामिळनाडूत राजकीय हालचालींना वेग आला आहे. टीव्हीकेला काँग्रेसच्या ५ आमदारांनी पाठिंबा दिला आहे. टीव्हीकेने विधानसभा निवडणुकीत १०८ जागा जिंकल्या आहेत. त्यात काँग्रेसच्या पाठबळामुळे टीव्हीकेची संख्या ११३ पर्यंत पोहचली आहे. अभिनेता थलापती विजय याने राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. परंतु ११८ चे बहुमत मिळवण्यासाठी टीव्हीकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. टीव्हीकेने त्यांच्या १०८ आमदारांना चेंगलपट्टूच्या एका हॉटेलमध्येच थांबवले आहे. त्यांना सत्ता स्थापनेसाठी ११८ आमदारांची गरज आहे. त्यामुळे राज्यात घोडेबाजार दाट शक्यता आहे. आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी सगळेच राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत. त्यात अण्णा द्रमुक पक्षात फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्सला वेग आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार AIADMK चे ज्येष्ठ नेते राज्यसभा खासदार आणि पक्षप्रमुख एडप्पाडी के. पलानीस्वामी यांचे निकटवर्तीय सी.व्ही. षण्मुगम यांनी पुदुचेरी येथे एका हॉटेलमध्ये २० खोल्या बुक केल्या आहेत. पक्षाकडून सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण वाटाघाटींच्या काळात आपल्या आमदारांना एकसंध ठेवण्याच्या उद्देशाने अनेक आमदार आधीच पुदुचेरी येथे पोहोचले आहेत तर इतर काहीजण वाटेवर आहेत. सविस्तर बातमी lokmat.com/national/resor… Tamil Nadu sees resort politics as AIADMK's 28 MLAs head to Puducherry, potentially backing actor Vijay's TVK party, which needs support to reach a majority. DMK is also reportedly in talks with AIADMK. #LokmatNews #MarathiNews #AIADMK #TVK #Tamilnadu
























