आपल्या आसपास लहान मुल्यांच्या हत्या होत आहे... बलात्काराला लहान पोरी बळी पडत आहे...आणि संध्याकाळी क्रिकेट मॅच आली की एक समाज हे विसरून जातो? एक क्रिकेट मॅच जिंकल्याचा आनंद इतका असतो की लहान मुलींचे बळी,बलात्कार सगळ शून्य ठरते? एक क्रिकेट मॅच माणूस म्हणून तुमच्या सर्व संवेदना मारून टाकते?!
“सरकारनं एक बारीक-सारीक लाडकं लेकरु योजना आणावी..” भोऱ्याची मागणी गांभीर्यानं घ्यावी! 😁😁
“मग आम्हाला पगार.. मोठाल्या लोकांना पगार.. लेकीला पगार.. सुनेला पगार.. मग सगळ्यांनाच पगार.. काम करायची गरजच नाही. फुकटचं बसून खायचं, बंद करा हे सगळं .. अशानं आळशी पिढी तयार होईल” - भोऱ्या
#MaharashtraPolitics#LadakiBahin
रोज नवीन तंत्रज्ञान येतेय. आपापल्या क्षेत्रात “Learning Machine” व्हायचे. यश सहज साध्य करण्याचा तो सोपा मार्ग आहे.
जातपात, अंधश्रद्धा आणि माणसामाणसातला द्वेष तुमचे मार्ग भटकावण्यासाठीचा जूना कावा आहे.
वित्त विभागाची मान्यता मिळाल्यानंतर #शिक्षणसेवक_मानधनवाढ देऊ हे गेल्या 3वर्षांपासून आम्ही ऐकतोय. हे ऐकता ऐकता 12हजार पैकी 6000 शिक्षणसेवकांचा कालावधी संपला पण #मानधनवाढ मिळाली नाही.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@dvkesarkar@BJP4Maharashtra
"शाळा नाही, मग आम्हाला शेळ्या द्या.."
इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा प्रशासनाने बंद केली आहे, तेथील विद्यार्थी आणि पालक आज नाशिक जिल्हा परिषदेत पायी निघाले आहेत... @mieknathshinde@dvkesarkar@Dev_Fadnavis
#म #मराठी
#शाळा
#शाळाबंदी_मागे_घ्या
शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन करून शाळा बंद केल्या जाताय. शाळा घरापासून दूर जाते तेव्हा मुलींचे शिक्षण थांबण्याचा धोका निर्माण होतो. शाळांचा ‘केस बाय केस स्टडी‘ झाला पाहिजे. सरसकट शाळाबंदीला विरोध. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @rajivkhandekar
एका शाळकरी मुलासाठी ट्रेन सुरु ठेवणारे #जपान आणि #पटसंख्या कमी म्हणून शाळा बंद करणारे भारतातील #महाराष्ट्र कुठे.#राजकारणातील #पैसा कमी करा, शाळा नको 🙏
गल्ले लठ्ठ पगार,सोयीसुविधा, प्रोटेक्शन, पेन्शन,vip जीवन #आमदार_खासदार मज्जेत.
@wankhedeprafull@RajGandre@TulsidasBhoite
सार्वजनिक वाचनालये ही कोणत्याही प्रगत, विकसित देशांची खरी संपत्ती…..
ज्या देशात अशी वाचनालये जपली जातात, आधूनिक पद्धतीने चालविली जातात तो देश, तिथली माणसं नेहमी काळाच्या पुढचा शोध घ्यायचा प्रयत्न करतात.
पुस्तकांमुळे तिथली माणसं आशावादी
#ThursdayThread #पुस्तक #वाचनालय
१/१२
जिल्हा परिषद शाळांना अध्यपान करणारा #शिक्षणसेवक महिन्याला #6000_मानधन घेतो, त्याच्या मानधनात गेल्या 10 वर्षात एक रुपयाही वाढता आला नाही. @dvkesarkar जी आपणास मराठी शाळा,तिथला शिक्षक संपवायचा आहे का? एकीकडे अन्य शिक्षकांचे वेतन वाढ होते आहे,मग आमचा शिक्षक असा गुलाम का केला जातोय.
मराठी बोलता, लिहिता, वाचता येणाऱ्यांनो
जरा लक्ष द्या. 👇
हा तक्ता मराठीतच आहे. माहितीच्या अधिकारातून मिळालेली रिक्त पदांची माहिती त्यात आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण विभागात हजारो शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
आता सांगा.
शिक्षणाचा बट्ट्याबोळ करणारे गद्दार कोण?
#शिक्षकभरती