
Mandar Bhanushe 🇮🇳
5.6K posts

Mandar Bhanushe 🇮🇳
@profmandar
Swayamsewak | E-Learning | MOOCs | Distance Edu | EduTech Consultant | Trainer | OER | Maths Edu|Public Speaker| ABVP National Vice President


राज्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांविरोधात परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. #ओला, #उबर आणि #रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी #सायबरक्राईम विभागाकडे पत्राद्वारे केली आहे. त्याचबरोबर परिवहन आयुक्त यांनी देखील यासंदर्भात सायबर क्राईम विभागाकडे पत्र पाठविले आहे. कोणतीही वैध परवानगी, शासन मान्यता किंवा परिवहन विभागाच्या नियमांचे पालन न करता ही प्रवासी वाहतूक सुरू आहे. विशेषतः रॅपिडोसारख्या संस्थांच्या अनधिकृत बाईक टॅक्सींचे प्रमाण वाढत असून, ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी पत्रात नमूद केले आहे. @PratapSarnaik #Ola #Uber #Rapido #cybercrime







































