Sanjay Rathod@SanjayDRathods
मृद व जलसंधारण विभागाचा अभिनव उपक्रम!
मृद व जलसंधारण विभागामार्फत प्रथमच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना “वैयक्तिक पुरस्कार” देण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे. दिनांक २० मे २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार, सन २०२५ करिता खालील अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या कार्याचा राज्यस्तरावर गौरव करण्यात येणार आहे.
#पुरस्कारप्राप्त अधिकारी :
#जिल्हा जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) व समकक्ष पदे :
श्री. अनंत र. जगताप,
तत्कालीन जिल्हा जलसंधारण अधिकारी, गोंदिया
#उपविभागीय जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-अ व समकक्ष पदे :
श्री. प्रशांत विठ्ठलराव आवंदकर, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, उपविभाग चांदूरबाजार, जि. अमरावती
#जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब (राजपत्रित) (सहायक अभियंता श्रेणी–२ / शाखा अभियंता) :
श्री. सुरेश सुभाष मंडलिक, जलसंधारण अधिकारी (राजपत्रित), उपविभाग संगमनेर, जि. अहिल्यनगर
#जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) (कनिष्ठ अभियंता) :
१. श्री. आकास शेषराव इंगळे, जलसंधारण अधिकारी (अराजपत्रित), उपविभाग चांदूरबाजार, जि. अमरावती
२. श्री. वेदांत रामचंद्र हाडे, जलसंधारण अधिकारी (अराजपत्रित), उपविभाग छत्रपती संभाजीनगर
या अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकुशलतेद्वारे, तांत्रिक ज्ञानाने आणि समर्पणाने विभागाच्या उद्दिष्टपूर्तीत मोलाचा वाटा उचलला आहे. त्यांच्या कार्यामुळे ग्रामीण भागात जलसंधारणाची चळवळ अधिक प्रभावीपणे पुढे गेली असून, टिकाऊ विकासाच्या दिशेने विभागाची वाटचाल अधिक मजबूत झाली आहे.
मृद व जलसंधारण विभागाने हा उपक्रम सुरू करून अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामगिरीला प्रेरणादायी सन्मान दिला आहे. हा अभिनव उपक्रम निश्चितच विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त करतो.