
Keshav Pagar
234 posts

Keshav Pagar
@KeshavPagar2
Mechanical Engineer


शिल्प निर्देशक" (ITI Instructor) भरती न्याय आंदोलन, आझाद मैदान मुंबई २४ सप्टेंबर २०२४ @AAPMaharashtra

#ITI INSTRUCTOR पदभरती मधील उमेदवारांना न्याय मिळावा यासाठी अनेकजण काल पासून आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. या आंदोलनास आमचा सक्रीय पाठिंबा असून आज दुपारी मी या आंदोलनात सहभागी होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळावा म्हणून आम्ही खंबीरपणे त्यांच्या सोबत शेवटपर्यंत आहोत. @AAPMaharashtra




संदर्भ : आप महाराष्ट्र /२०२४/२००९०३ प्रति, मा. मंगलप्रभात लोढा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य विषय - आचारसंहितापूर्वी १४५७ पदापैकी उर्वरित ३९४ विद्यार्थ्यांना कोर्टाच्या निर्णयास अधीन राहून (Subject to outcome of court result) नियुक्ती देण्याबाबत. माननीय महोदय, आपल्या अखत्यारीतील "शिल्प निर्देशक" (ITI Instructor) च्या १४५७ पदांसाठी ऑगस्ट २०२२ मध्ये जाहिरात प्रदर्शित करण्यात आली होती. त्यानुसार सप्टेंबर २०२२ मध्ये पूर्व परीक्षा घेण्यात आली व नंतर जून २०२३ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. मुख्य परीक्षेनंतर संपूर्ण कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण होऊन १४५७ पैकी १०६३ उमेदवारांना न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत व उर्वरित ३९४ उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या वेळेस काही उमेदवार न्यायालयात गेले असल्यामुळे हि भरती थांबली आहे. "कोर्टाचा जो काही निर्णय भविष्यामध्ये येईल तो आम्हा उमेदवारांना मान्य असेल" या अटीवर या ३९४ उमेदवारांची न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या अगोदर नियुक्त्या द्याव्यात हि या उमेदवारांची मागणी आहे. आपणांस विनंती करण्यात येत आहे कि वरील मागणीचा विचार करून योग्य निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. धन्यवाद, @MPLodha @mieknathshinde





















