P Ppr retweetledi

“१० हजारांसाठी ३ लाखांचे नुकसान करणार नाही” हे विधान म्हणजे संधीसाधू “फडणवीस पवार शिंदे” सरकारचा उद्धट अहंकार, प्रशासकीय अपयश आणि विद्यार्थ्यांविषयीचा तिरस्कार उघड करणारे आहे. हे उत्तर नाही तर ही राज्यातील अन्यायग्रस्त परीक्षार्थींच्या थेट मानसिक छळाची कबुली आहे.
आमचे सवाल टाळू नका, उत्तर द्या :
🔥 १५–२० दिवस परीक्षा पुढे ढकलली तर ३ लाखांचे नुकसान होते, पण MPSC २–२ वर्षे निकाल लटकवते तेव्हा नुकसान होत नाही?
🔥 जाहिरात ७ महिने उशिरा काढणे तुमची चूक, आणि शिक्षा विद्यार्थ्यांना? ही कसली मस्ती?
🔥 ज्यांचे वय संपले, त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार - त्यापेक्षा इतरांचे १५ दिवस मोठे?
🔥 तुटपुंज्या जागा, शून्य नियोजन, शून्य जबाबदारी-तरीही सरकार येवढ्या माजात?
अन्याय सहन करणे नव्हे, त्याविरुद्ध उभे राहणे हाच न्याय असतो. विद्यार्थ्यांच्या भविष्यावर पाय देणारा सत्तेचा अहंकार तुम्हाला भोवणार आहे हे नक्की!
जाहीर निषेध!
@INCHarshsapkal @VijayWadettiwar @satejp @prithvrj @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks
#MPSC #PuneProtest #MPSC_Postpone #StopMentalTorture
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR
MR

























