

Vidyapith Vidyarthi Sangharsh Kruti Samiti, SPPU
3.8K posts

@SPPUSUofficial
विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे| #SPPU #PuneUniversity #पुणेविद्यापीठ







Many students of #SPPU are unable to submit their exam forms as their PRN validity has expired. Last year, the University extended PRN validity for such students. This year too, we request a similar extension to ensure no student loses academic opportunity. (1/2) #PuneUniversity

















इयत्ता पहिलीतून हिंदीची सक्ती नको! मराठी आणि इंग्रजी – या दोनच भाषा पुरेशा आहेत! राज्य सरकारने तात्काळ लेखी आदेश काढावा. भाषिक अस्मिता जपण्याची हीच वेळ आहे. @CMOMaharashtra @dadajibhuse @AjitPawarSpeaks #मराठीशाळा #भाषिकअस्मिता #हिंदीसक्तीनको #म



प्रति, मा.श्री.दादा भुसे शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य, सस्नेह जय महाराष्ट्र, गेले जवळपास २ महिने महाराष्ट्रात पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा शिकवणे यावरून सरकारकडून प्रचंड गोंधळ घालणं सुरु आहे. सुरुवातीला पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा विद्यार्थ्यांना शिकवणार आणि त्यात हिंदी भाषा ही तिसरी सक्तीची भाषा असेल असं घोषित केलं गेलं. ज्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवला, आणि ज्याच्यामुळे जनभावना तयार झाली. ती जनभावना इतकी तीव्र होती की सरकारने तिसऱ्या भाषेसाठी हिंदी भाषेची सक्ती केली जाणार नाही असं घोषित केलं. मुळात हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, देशातील इतर प्रांतातील भाषांसारखी एक भाषा. ती शिकण्याची सक्ती का केली जात होती ? कुठल्यातरी दबावाखाली सरकार घरंगळत का जात होतं हे माहित नाही. पण मुळात पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा मुलांना का शिकायला लावायच्या हा मुद्दा आहेच. मग त्याबाबत पण आपण घोषणा केलीत की महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील. पण या घोषणेचा लेखी अध्यादेश अजून का आला नाही ? माझ्या महाराष्ट्र सैनिकांची माहिती आहे की आधीच्या तीन भाषा शिकवणे आणि त्यात हिंदीचा समावेश असणे या निर्णयाचा आधार घेऊन, हिंदी भाषेच्या पुस्तक छपाईला केंव्हाच सुरु झाली आहे. आता पुस्तकं छापली आहेत मग पुन्हा आपल्याच निर्णयावर घुमजाव करायचं असं काही करण्याचा सरकारचा काही डाव तर नाही ना ? असं काही नसेल असं मी गृहीत धरतो, पण असं काही झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे आंदोलन उभं करेल त्याला सरकार जबाबदार असेल. देशातील अनेक राज्यांनी इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा आणि हिंदीची सक्ती झुगारून दिली, याला कारण त्या त्या राज्यांची भाषिक अस्मिता. ( मंत्री महोदय आपण आपले सहकारी मंत्रिमंडळ हे देखील जन्माने मराठी आहात , आपण इतर राज्यातील हिंदीला विरोध करणाऱ्या शासनकर्त्यां सारखे कधी वागणार आणि आपल्या भाषेची अस्मिता कधी आणि कशी जोपासणार ? ) त्या इतर राज्यांसारखी तीव्र अस्मिता सरकार पण दाखवेल अशी अपेक्षा. त्यामुळे शिक्षण विभागाने इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील ( मराठी आणि इंग्रजी ) या निर्णयाचा लेखी आदेश लवकरात लवकर जारी करावा. राज ठाकरे ।


Buldhana : मराठी शाळा वाचवण्यासाठी सरपंचबाईंचा धाडसी निर्णय, ZP शाळेत प्रवेश अॅडमिशन घेतल्यास घरपट्टी अन् पाणीपट्टी माफ! #Buldhana #School #grampanchayat news18marathi.com/maharashtra/bu…

१५० दिवसांच्या कार्यक्रमात भरती प्रक्रिया राबवावी असे आदेश आहेत,सद्ध्या जलसंधारण विभागात मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे,जलयुक्त शिवार ३.० देखील आहे यामुळे जलसंधारण विभागाने देखील आकृतीबंधाचे काम तातडीने पूर्ण करून रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे आहे.#WCD_recrutiment @SanjayDRathods


