Mayor of Mumbai

1.1K posts

Mayor of Mumbai banner
Mayor of Mumbai

Mayor of Mumbai

@mayor_mumbai

मुंबईच्या महापौर यांचे कार्यालयीन हॅण्डल l Official handle of the Mayor of Mumbai

Mumbai, India Katılım Şubat 2020
1 Takip Edilen35.4K Takipçiler
Mayor of Mumbai
Mayor of Mumbai@mayor_mumbai·
घाटकोपरमध्ये गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेस महापौर श्रीमती रितू तावडे यांची प्रमुख उपस्थिती गुढीपाडव्याचे औचित्य साधून, मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घाटकोपर (पूर्व) प्रभाग क्रमांक १३१ मध्ये नगरसेविका श्रीमती राखी जाधव यांच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला मुंबईच्या महापौर श्रीमती रितू राजेश तावडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. आमदार श्री. पराग शाह, आमदार श्री. मिहिर कोटेचा, एन प्रभाग समिती अध्यक्ष श्रीमती अश्विनी मते, नगरसेवक श्री. धर्मेश गिरी यांचेसह स्थानिक नागरिक उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझिमच्या तालावर निघालेल्या या शोभायात्रेत सर्व मान्यवर तसेच स्थानिक नागरिकांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला. #गुढीपाडवा #gudipadwa @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi @JadhavRakhee @ParagShahBJP @mihirkotecha
MR
0
0
2
141
Mayor of Mumbai
Mayor of Mumbai@mayor_mumbai·
एन विभागातील नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांना महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या हस्ते प्रारंभ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परिमंडळ ६ अंतर्गत, पावसाळ्यापूर्वीची नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे (Desilting) युद्धपातळीवर सुरू झाली आहेत. या कामाचाच एक भाग म्हणून मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या हस्ते 'एन' विभागातील सोमय्या नाला येथे गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. मुंबईतील पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून, बृहन्मुंबई महानगरपालिकेने नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे नियोजित वेळेत हाती घेतली आहेत. यामध्ये, 'एन' विभागातील एकूण १४ नाल्यांमधून गाळ काढला जाणार असून या नाल्यांची एकूण लांबी १५,८८५ मीटर इतकी आहे. यामध्ये सोमय्या नाला आणि लक्ष्मीबाग नाला यासारख्या प्रमुख नाल्यांचा समावेश आहे. एकूण २२,५११ मेट्रिक टन गाळ काढण्याचे वार्षिक उद्दिष्ट आहे. याप्रसंगी महापौर श्रीमती रितू तावडे म्हणाल्या की, पावसाळ्यात पाण्याचा जलद निचरा होणे, ही महानगरपालिकेची प्राथमिकता आहे. मे २०२६ अखेरपर्यंत पावसाळ्यापूर्वीचा निर्धारित पूर्ण गाळ काढण्याचे लक्ष्य ठेवले आहे. प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत की, गाळ काढण्याचे काम पारदर्शक पद्धतीने आणि नियोजित वेळेतच पूर्ण व्हावे, असे महापौरांनी नमूद केले. याप्रसंगी परिमंडळ ६ मधील कार्यकारी अभियंता श्री. सचिन जाधवर, संबंधित अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
MR
1
0
4
273
Mayor of Mumbai
Mayor of Mumbai@mayor_mumbai·
मुंबई अखंडपणे धावण्यामागे महिलांचे योगदान मोठे ‘सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांचे प्रतिपादन स्त्रियांनी मनाने कणखर असले पाहिजे. आज या कार्यक्रमात उपस्थित प्रत्येक महिला ही केवळ अधिकारी किंवा कर्मचारी नव्हे तर मुंबईसारख्या महानगराला पुढे नेणाऱ्या शक्तीचा एक महत्त्वाचा हिस्सा आहे. मुंबई कधीच झोपत नाही. मुंबई अखंडपणे धावण्यामागे महिलांचेही मोठे योगदान आहे. घराबाहेर पडून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या महिलेसह घर सांभाळणाऱ्या गृहिणीचाही गौरव झाला पाहिजे, अशा शब्दात मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी प्रत्येक क्षेत्रातील महिलांचा गौरव केला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंध प्रमुख अंतर्गत तक्रार समिती आणि सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्राच्या वतीने आयोजित 'सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार २०२६’ वितरणप्रसंगी महापौर श्रीमती रितू तावडे बोलत होत्या. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन सभागृहात आज (दिनांक १८ मार्च २०२६) हा पुरस्कार सोहळा पार पडला. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, प्रधान आयकर आयुक्त डॉ. (श्रीमती) पल्लवी दराडे, स्नेहा इंडियाच्या संस्थापक व पद्मश्री सन्मानित डॉ. अर्मिडा फर्नांडिस, उप आयुक्त (परिमंडळ १) तथा सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्राच्या अध्यक्ष श्रीमती चंदा जाधव आदींसह पुरस्कार्थी अधिकारी-महिला उपस्थित होत्या. महापौर श्रीमती रितू तावडे म्हणाल्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अन्यायाविरोधात उभे राहत मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग खुला केला. त्यांच्या या धैर्यामुळे आज प्रशासन, राजकारण, समाजकारण अशा अनेक क्षेत्रात महिला नेतृत्व करीत आहेत. स्त्री समाज घडविते. पण योग्य संधी मिळाली तर ती इतिहासही घडविते. बृहन्मुंबई महानगरपालिकेने सावित्रीबाई फुले स्री संसाधन केंद्राची स्थापना केली आहे. याद्वारे कायदेशीर मार्गदर्शन, मानसिक आजारावर मात करण्यासाठी समुपदेशन, वैद्यकीय सहाय्यासाठी मदत दिली जाते. अत्याचार झालेल्या पीडित महिलेला योग्य न्याय मिळावा यासाठी महानगरपालिकेने विशेष वैद्यकीय कार्यप्रणाली तयार केली आहे, असेही महापौर श्रीमती रितू तावडे म्हणाल्या. या कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांत कार्यरत महिला अधिकाऱ्यांचा तसेच पुरुष अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये भाभा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा भारती, राजावाडी रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल राऊत, प्रमुख कामगार अधिकारी श्री. सुनील जांगळे, शताब्दी रुग्णालय परिचारिका श्रीमती स्वाती दांगट, विभागीय अग्निशमन अधिकारी श्री. पुरुषोत्तम संदिकर, प्रशासकीय अधिकारी (शाळा) श्री. विजय जाधव, अशासकीय सदस्य श्रीमती वंदना सिंह, सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्राच्या कार्यकारी सहायक श्रीमती रोहिणी नाईक तसेच अशासकीय सदस्य श्रीमती स्नेहा खांडेकर यांचा गौरव करण्यात आला. @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
Mayor of Mumbai tweet mediaMayor of Mumbai tweet mediaMayor of Mumbai tweet mediaMayor of Mumbai tweet media
MR
0
0
5
152
Mayor of Mumbai
Mayor of Mumbai@mayor_mumbai·
सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद - महापौर चषक क्रीडा स्पर्धा सन २०२५-२६च्या बैठकीत महापौर श्रीमती रितू तावडे यांची माहिती डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी व्हायला हवा. मुलांना मैदानी खेळांकडे वळविण्यासाठी महापौर चषक क्रीडा स्पर्धा उत्तम संधी आहे. आजच्या युगातील मुलांचे भ्रमणध्वनी नव्हे तर मैदानी खेळांकडे लक्ष वळविण्यासाठी महापौर चषक क्रीडा स्पर्धा नक्कीच हातभार लावणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या सन २०२६-२७ च्या महापौर चषक क्रीडा स्पर्धेसाठी पाच कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली जाईल, असे आश्वासन मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी दिले. महापौर चषक क्रीडा स्पर्धा सन २०२५-२६ मध्ये सहभागी होणाऱ्या विविध संघांना अधिकाधिक सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, अशी माहितीही महापौर श्रीमती तावडे यांनी दिली. महापौर चषक क्रीडा स्पर्धा सन २०२५-२६ च्या आयोजनाबाबत मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील समिती सभागृहात संयुक्त सभेचे आज (दिनांक १८ मार्च, २०२६) आयोजन केले होते. यावेळी उपमहापौर श्री. संजय घाडी, विरोधी पक्षनेता श्रीमती किशोरी पेडणेकर, बेस्ट समिती अध्यक्ष श्रीमती तृष्णा विश्वासराव, समाजवादी पक्षाच्या गटनेता श्रीमती अमरीन शहजाद अब्राहनी, महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी, नगरसेवक श्री. धर्मेश गिरी, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. किर्तीवर्धन किरतकुडवे आदींसह मुंबई शहर आणि उपनगरांतील विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. महापौर श्रीमती रितू तावडे म्हणाल्या, स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांना महानगरपालिकेचे क्रीडांगण सहजासहजी व कमी शुल्कात उपलब्ध करुन देण्याबाबतही विचार केला जाईल, अशा शब्दात त्यांनी उपस्थित संघटनांना आश्वस्त केले. तसेच स्पर्धेसाठी तयारी करण्याकरिता वेळ मिळावा, या क्रीडा संघटनांच्या मागणीचा विचार करता तीनऐवजी चार महिन्यांचा कालावधी देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. मैदानांबाबत काही अडचणी असतील तर त्या देखील सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. काही मैदानांवर शुल्क आकारले जात असेल तर त्या शुल्कातही सवलत देण्यात येईल. यासोबतच महापौर चषक क्रीडा स्पर्धेत स्थानिक नगरसेवकांनाही सामावून घेतल्यास स्पर्धा अधिक व्यापक प्रमाणात घेता येईल, असेही त्या म्हणाल्या. शैक्षणिक संस्थांची मैदाने स्पर्धेसाठी देण्यात यावीत, या मागणीचाही सकारात्मक पद्धतीने विचार करू, असे आश्वासनही महापौर श्रीमती तावडे यांनी दिले. @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi @KishoriPednekar @officeoftrushna
Mayor of Mumbai tweet mediaMayor of Mumbai tweet mediaMayor of Mumbai tweet mediaMayor of Mumbai tweet media
MR
1
0
5
198
Mayor of Mumbai retweetledi
Ritu Tawde
Ritu Tawde@TawdeRitu·
दि. १५ मार्च २०२६ आज घाटकोपर येथील 'सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी मित्र मंडळ' तर्फे आयोजित 'वार्षिक कौटुंबिक स्नेहसंमेलन २०२६' या दिमाखदार सोहळ्याला उपस्थित राहिले. आपल्या कोकणच्या संस्कृतीचे दर्शन आणि मुंबईत राहणाऱ्या सिंधुदुर्गवासीयांचा हा जिव्हाळा पाहून मन प्रसन्न झाले. एकाच छताखाली जमलेले सर्व सिंधुदुर्गवासीय आणि त्यांच्यातील एकोपा खरोखरच कौतुकास्पद आहे. आपल्या मातीची ओढ आणि परंपरा जपणारी ही मंडळी समाजासाठी एक आदर्श आहेत. याप्रसंगी नगरसेविका श्रीमती राखीताई जाधव, मंडळाचे अध्यक्ष श्री. भूषण दत्ता सामंत, सचिव श्री. हेमंत जयदेव जाधव, खजिनदार श्री. अजित वासुदेव घाडीगांवकर आणि सर्व पदाधिकारी तसेच सभासदांशी संवाद साधता आला. या सुंदर आयोजनाबद्दल आणि अगत्याबद्दल मी मंडळाचे मनापासून आभार मानते. मंडळाच्या पुढील वाटचालीस आणि सामाजिक कार्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा! 💐 #AnnualFamilyGathering2026 #Ghatkopar #CommunityEvent #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika #BMC #bjp4mumbai @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @ShelarAshish @MPLodha @JadhavRakhee @mybmc
Ritu Tawde tweet mediaRitu Tawde tweet mediaRitu Tawde tweet mediaRitu Tawde tweet media
MR
4
1
15
540
Mayor of Mumbai
Mayor of Mumbai@mayor_mumbai·
शासनाच्या सेवा नागरिकांच्या दारी पोहोचविणे हीच खरी लोकाभिमुख प्रशासनाची ओळख घाटकोपर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ शिबिरात मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांचे उद्गार शासनाच्या विविध सेवा सामान्य नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि जलद पद्धतीने त्यांच्या परिसरातच उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत घाटकोपर येथे आयोजित विशेष महसूल समाधान शिबिराला मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज भेट दिली. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत, कुर्ला तहसीलदार कार्यालय यांच्या वतीने, घाटकोपर मधील उपाश्रया लेन स्थित शेठ धनजी देवशी राष्ट्रीय शाळा येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे या उपस्थित होत्या. नगरसेवक श्रीमती राखी जाधव, नगरसेवक श्रीमती निर्मिती कानडे, नगरसेवक श्री. धर्मेश गिरी यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. शिबिरात नागरिकांशी संवाद साधताना महापौर श्रीमती रितू तावडे म्हणाल्या की, “शासनाच्या सेवा नागरिकांच्या दारी पोहोचविणे हीच खरी लोकाभिमुख प्रशासनाची ओळख आहे. ‘महाराजस्व अभियान’ सारख्या उपक्रमांमुळे नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन प्रशासकीय अडचणी दूर होण्यास मोठी मदत होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या या अभियानाचा उद्देश नागरिकांच्या महसुली संदर्भातील दैनंदिन समस्या, विविध प्रमाणपत्रे व प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढणे हा आहे. मंडळ स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या या विशेष शिबिरांमुळे शासनाच्या सेवा नागरिकांच्या जवळ पोहोचत असून प्रशासन अधिक गतिमान आणि लोकाभिमुख होत आहे, असे महापौरांनी नमूद केले. तसेच, शासनाच्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी कागदपत्र पडताळणी व पूर्तता (केवायसी) करून घेण्यासाठी एक दालन समाविष्ट करावे, अशी सूचना देखील महापौरांनी केली. या शिबिरामध्ये नागरिकांना उत्पन्न, रहिवास, जात, नॉन-क्रिमिलेअर आदी विविध दाखले, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना यांसारख्या विविध शासकीय योजनांसाठी अर्ज स्वीकृतीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. याशिवाय नागरिकांच्या अर्जांची पडताळणी, आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन तसेच प्रलंबित प्रकरणांतील त्रुटींची पूर्तता करून घेण्याचे कामकाजही या शिबिरामध्ये करण्यात आले. यावेळी नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध योजनांचे लाभार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे अनेक शासकीय कामांसाठी नागरिकांना एका ठिकाणीच सुविधा उपलब्ध झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi @JadhavRakhee @CollectorMsd
Mayor of Mumbai tweet mediaMayor of Mumbai tweet mediaMayor of Mumbai tweet mediaMayor of Mumbai tweet media
MR
1
0
3
315
Mayor of Mumbai retweetledi
Ritu Tawde
Ritu Tawde@TawdeRitu·
दि. १४ मार्च २०२६ आज घाटकोपर पूर्वचे सेवाभावी आमदार मा. श्री. परागभाई शाह यांच्या मार्गदर्शनाखाली, कुर्ला तहसीलदार कार्यालयांतर्गत आयोजित "छत्रपती शिवाजी महाराज - महाराजस्व समाधान शिबीर अभियान" मध्ये सहभागी झाले. "शिवरायांचा मार्ग, प्रगतीचा ध्यास" या ब्रीदवाक्याला स्मरून, घाटकोपर पूर्वेतील शेठ धनजी देवशी राष्ट्रीय शाळेत हे विशेष शिबीर संपन्न झाले. देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या 'जनसेवा' संकल्पनेतून, सामान्य नागरिकांच्या समस्यांचे एकाच छताखाली निराकरण व्हावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या शिबिरादरम्यान नागरिकांना विविध शासकीय योजना, अर्जांचे नमुने आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती क्युआर कोडसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपलब्ध करून देण्यात आली. जिल्हाधिकारी मा. सौरभ कटियार (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असलेल्या या अभियानामुळे सरकारी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गतिमान झाली आहे. यावेळी माझ्यासह नगरसेवक श्री. धर्मेश गिरी जी, नगरसेविका श्रीमती राखीताई जाधव, नगरसेविका श्रीमती निर्मिती कानडे जी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अनेक लाभार्थ्यांशी संवाद साधताना हे स्पष्ट झाले की, अशा उपक्रमांमुळे सर्वसामान्य जनतेचा वेळ वाचतोय आणि त्यांना त्यांचे हक्क सन्मानाने मिळत आहेत. एक लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या कामात सहभागी होऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावणे, हे माझे कर्तव्य आहे. घाटकोपरमधील या शिबिराला नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मी त्यांचे आभार मानते. आमदार पराग शाह जी यांच्या कुशल नेतृत्वाखाली, मुंबई महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन मिळून मुंबईकरांचे जीवन अधिक सुसह्य करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली 'विकसित भारताचा' संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. #महाराजस्व_समाधान_शिबीर_अभियान #JanSeva #SwarajyaToSurajya #GovernmentAtYourDoorstep #PublicService #DigitalIndia #CitizenFirst #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika #bmc #bjp4mumbai @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @narendramodi @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @ShelarAshish @MPLodha @ParagShahBJP @JadhavRakhee @mybmc
Ritu Tawde tweet mediaRitu Tawde tweet mediaRitu Tawde tweet mediaRitu Tawde tweet media
MR
1
4
26
1.6K
Mayor of Mumbai retweetledi
माझी Mumbai, आपली BMC
मुंबईतील पावसाळापूर्व नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांविषयीची आढावा बैठक महापौर श्रीमती रितू तावडे यांच्‍या अध्यक्षतेखाली महानगरपालिका मुख्यालय येथे आज पार पडली. उपमहापौर श्री. संजय घाडी, सभागृह नेते श्री. गणेश खणकर, स्‍थायी समिती अध्‍यक्ष श्री. प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्‍यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर, सुधार समिती अध्‍यक्ष श्रीमती संध्‍या दोशी, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) श्री. अभिजीत बांगर, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्री. अविनाश ढाकणे यांच्‍यासह सर्व परिमंडळ सहआयुक्‍त/ उप आयुक्‍त, सर्व विभागांचे सहायक आयुक्‍त व पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. मुंबई महानगरातील प्रमुख नाले व लहान नाले यातून गाळ काढण्‍याची सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. त्‍यासाठी आवश्‍यक मनुष्‍यबळ व संसाधनांचा प्रभावीपणे वापर करावा. प्रशासकीय विभाग कार्यालय (Ward Ofiice) आणि मध्‍यवर्ती यंत्रणा (Central Agency) यांच्‍यात समन्‍वय राखून कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. लोकप्रतिनिधी व नगरसेवक यांना प्रत्‍येक कामाच्‍या टप्‍प्‍याची नियमित माहिती द्यावी. ज्‍या नाल्‍यांची स्‍वच्‍छता सुरू आहे त्‍या ठिकाणी संबंधित नाल्‍याची लांबी - रूंदी, गाळ काढण्‍याचे परिमाण, कालावधी, कंत्राटदाराचे नाव आणि संबंधित अभियंत्‍याचा संपर्क क्रमांक आदींची माहिती दर्शविणारा फलक कार्यस्‍थळी लावावा. नाल्‍यातून काढलेल्‍या गाळाची ४८ तासात योग्‍य प्रकारे विल्‍हेवाट लावावी. नाले स्‍वच्‍छतेच्‍या कामात पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी गाळ काढण्‍यापासून ते क्षेपणभूमीवर त्‍याची विल्‍हेवाट लावण्‍यापर्यंतच्‍या सर्व टप्‍प्‍यांचे छायाचित्रण, चित्रिकरण अनिवार्य करावे, असे विविध निर्देश महापौर श्रीमती रितू तावडे यांनी दिले आहेत. सर्व पदाधिकाऱ्यांनी देखील विविध सूचना केल्‍या. अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) श्री. बांगर यांनी पर्जन्‍य जलवाहिन्‍या विभाग आणि रस्‍ते व वाहतूक विभागामार्फत सुरू असलेल्‍या कामकाजाची माहिती दिली. तर, महापौर श्रीमती रितू तावडे यांच्‍यासह सर्व लोकप्रतिनिधींनी दिलेल्‍या निर्देशांचे सर्व सह आयुक्‍त / उप आयुक्‍त, सहायक आयुक्‍त यांनी काटेकोरपणे पालन करावे. नगरसेवक यांसमवेत संवाद साधावा. त्‍यांच्‍या तक्रारींचे निराकरण करून प्रतिसाद द्यावा, असे निर्देश अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. शर्मा यांनी दिले. #mybmcupdates @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
माझी Mumbai, आपली BMC tweet mediaमाझी Mumbai, आपली BMC tweet mediaमाझी Mumbai, आपली BMC tweet mediaमाझी Mumbai, आपली BMC tweet media
MR
10
16
65
5.3K
Mayor of Mumbai retweetledi
माझी Mumbai, आपली BMC
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष, उप अध्यक्ष पदासाठीची निवडणूक आज महानगरपालिका मुख्यालयात पार पडली. सार्वजनिक आरोग्य समितीच्या अध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाचे श्री. हरिष भांदिर्गे यांची बिनविरोध निवड झाली. तसेच उप अध्यक्ष पदासाठी शिवसेना पक्षाचे श्री. रितेश राय यांची निवड करण्यात आली. बाजार व उद्यान समिती अध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या श्रीमती हेतल गाला यांची निवड झाली. तसेच उप अध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे श्री. भास्कर शेट्टी यांची निवड झाली. यावेळी सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समितीचे सदस्य उपस्थित होते. सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष, उप अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून अनुक्रमे महापौर श्रीमती रितू तावडे, उप महापौर श्री. संजय घाडी यांनी कामकाज पाहिले. #mybmcupdates @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
माझी Mumbai, आपली BMC tweet mediaमाझी Mumbai, आपली BMC tweet mediaमाझी Mumbai, आपली BMC tweet mediaमाझी Mumbai, आपली BMC tweet media
MR
4
17
70
6.4K
Mayor of Mumbai retweetledi
Ritu Tawde
Ritu Tawde@TawdeRitu·
दि. १३ मार्च २०२६ पावसाळ्यात मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज! आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील प्रमुख नाले, लहान नाले आणि मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामांचा आज सविस्तर आढावा घेतला. मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयोजित या बैठकीत कामांचा दर्जा आणि वेळेचे नियोजन यावर प्रामुख्याने भर देऊन प्रशासनाला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. बैठकीत दिलेले प्रमुख निर्देश: ✅ वेळेत काम पूर्ण करणे: नालेसफाईची सर्व कामे पावसाळ्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होणे अनिवार्य आहे. यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि संसाधनांचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ✅ यंत्रणांमध्ये समन्वय: विभाग कार्यालय (Ward Office) आणि मध्यवर्ती यंत्रणा (Central Agency) यांनी एकमेकांशी समन्वय राखून निर्धारित वेळेत कामे मार्गी लावावीत. ✅ पारदर्शकता आणि माहिती: ज्या ठिकाणी सफाई सुरू आहे, तिथे कामाचे स्वरूप, ठेकेदाराचे नाव आणि अभियंत्याचा संपर्क क्रमांक दर्शवणारे फलक लावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, लोकप्रतिनिधींना कामाच्या प्रत्येक टप्प्याची नियमित माहिती दिली जावी. ✅ गाळाची विल्हेवाट: नाल्यातून काढलेला गाळ ४८ तासांच्या आत हटवून त्याची योग्य विल्हेवाट लावावी. ✅ चित्रीकरण अनिवार्य: संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी गाळ काढण्यापासून ते क्षेपणभूमीवर नेईपर्यंतचे फोटो आणि व्हिडिओ चित्रीकरण अनिवार्य केले आहे. मुंबईकरांना पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने काम करेल. पारदर्शकता आणि गुणवत्ता यावर आमचा विशेष कटाक्ष असून, पावसाळापूर्व तयारी ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. या बैठकीला उपमहापौर श्री. संजय घाडी जी, सभागृह नेते श्री. गणेश खणकर जी, स्‍थायी समिती अध्‍यक्ष श्री. प्रभाकर शिंदे जी, शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर जी, सुधार समिती सभापती श्रीमती संध्‍या दोशी जी, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) श्री. अभिजीत बांगर, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पूर्व उपनगरे) श्री. अविनाश ढाकणे यांच्‍यासह सर्व परिमंडळ सहआयुक्‍त/ उप आयुक्‍त, सर्व विभागांचे सहायक आयुक्‍त या बैठकीस उपस्थित होते. #ViksitMumbai #MUmbai #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @misanjayghadi @GaneshKhankar @prabhakarsbjp @RajeshreeAtWork @sandhya_vipul @mybmc
Ritu Tawde tweet mediaRitu Tawde tweet mediaRitu Tawde tweet mediaRitu Tawde tweet media
MR
3
2
23
1.4K
Mayor of Mumbai retweetledi
Ritu Tawde
Ritu Tawde@TawdeRitu·
दि. १३ मार्च २०२६ जिद्द, चिकाटी आणि अथांत मेहनतीचे मूर्तिमंत उदाहरण - चिमुरडा मानस पाटील! 🏆🌊 मुंबईच्या मातीतील प्रतिभेला वयाचे बंधन नसते, हे उरणच्या अवघ्या ६ वर्षीय मानस जयेश पाटील याने जगाला दाखवून दिले आहे. नागाव बीच ते जे.एन.पी.ए. बंदर हे १७ किमीचे अथांग अंतर केवळ ४ तास ५० मिनिटांत पोहून पार करत मानसने जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. 'वर्ल्ड्स यंग्येस्ट सी स्विमर' म्हणून त्याने मिळवलेले हे यश प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे. आज या 'बालविक्रमवीराची' भेट घेऊन त्याचा यथोचित सत्कार केला. अथांग समुद्राच्या लाटांशी दोन हात करत त्याने जो पराक्रम गाजवला आहे, तो खरोखरच थक्क करणारा आहे. त्याच्याशी संवाद साधताना जाणवलेला त्याचा आत्मविश्वास आणि "देशाचे नाव उंचावायचे आहे" ही त्याची जिद्द पाहून खूप आनंद झाला. मानसच्या या यशामागे त्याचे आई-वडील, प्रशिक्षक मणिक पाटील, सुनील पाटील आणि सुनील मझेकर यांचे अपार कष्ट आणि मार्गदर्शन आहे. अशा उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देणे ही आपली जबाबदारी आहे. मानस, तुझा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तू भविष्यात असेच नवनवीन विक्रम प्रस्थापित करून देशाची मान उंचावावीस, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना आणि तुला पुढील वाटचालीस भरघोस शुभेच्छा! 💐✨ #ManasPatil #WorldYoungestSeaSwimmr #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @ShelarAshish @MPLodha @mybmc
Ritu Tawde tweet mediaRitu Tawde tweet mediaRitu Tawde tweet media
MR
1
4
45
1.4K
Mayor of Mumbai retweetledi
Ritu Tawde
Ritu Tawde@TawdeRitu·
दि. १३ मार्च २०२६ आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात 'शालेय साहित्य' आणि इतर महत्त्वाच्या विषयांसंदर्भात आयोजित करण्यात आली होती. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे सर्व शालेय साहित्य वेळेवर आणि दर्जेदार पद्धतीने मिळावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली असून, महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांचा आढावा घेण्यात आला. प्रशासनाने या प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग राखावा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. याप्रसंगी माझे सहकारी, उपमहापौर श्री. संजय घाडी जी, सभागृह नेते श्री. गणेश खणकर जी, शिवसेना गटनेते श्री. अमेय घोले जी, स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे जी, शिक्षण समिती अध्यक्षा श्रीमती राजश्री शिरवडकर, सुधार समिती अध्यक्ष श्रीमती संध्या दोषी जी आणि इतर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. मुंबईतील प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम शैक्षणिक वातावरण मिळावे, यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. #StudentWelfare #ViksitMumbai #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika #BMC #bjp4mumbai @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @misanjayghadi @GaneshKhankar @AmeyGhole @prabhakarsbjp @RajeshreeAtWork @Rajesh_Shirwadk @sandhya_vipul
Ritu Tawde tweet mediaRitu Tawde tweet mediaRitu Tawde tweet mediaRitu Tawde tweet media
MR
3
1
17
585
Mayor of Mumbai retweetledi
Ritu Tawde
Ritu Tawde@TawdeRitu·
दि. १३ मार्च २०२६ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षपदी श्री. हरीश भांदिर्गे जी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. मुंबईकरांचे आरोग्य हीच आमची प्राथमिकता आहे. भांदिर्गे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य समिती आगामी काळात मुंबईतील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्यासाठी यशस्वीरीत्या कार्य करेल, असा मला ठाम विश्वास आहे. त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा! #ViksitMumbai #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika #BMC #bjp4mumbai @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @ShelarAshish @MPLodha @HarishBhandirge
Ritu Tawde tweet mediaRitu Tawde tweet mediaRitu Tawde tweet mediaRitu Tawde tweet media
MR
4
4
41
825
Mayor of Mumbai retweetledi
Ritu Tawde
Ritu Tawde@TawdeRitu·
दि. १२ मार्च २०२६ मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज मुंबई महानगरपालिका (BMC) मुख्यालयात माजी मंत्री, आजी-माजी नगरसेवक आणि विविध कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी प्रभागातील प्रलंबित विकासकामे, पायाभूत सुविधा आणि नागरी समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रशासकीय स्तरावर या कामांना गती देऊन मुंबईकरांना दिलासा देणे हीच आमची प्राथमिकता आहे. #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika #BMC #bjp4mumbai @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @ShelarAshish @MPLodha @mybmc
Ritu Tawde tweet mediaRitu Tawde tweet mediaRitu Tawde tweet mediaRitu Tawde tweet media
MR
3
4
30
732
Mayor of Mumbai retweetledi
Ritu Tawde
Ritu Tawde@TawdeRitu·
दि. 12 मार्च 2026 'जागतिक किडनी दिन' निमित्त 'लखानी किडनी केअर' तर्फे आयोजित 'Kidney Health for All' या विशेष उपक्रमात सहभागी होऊन आरोग्य जागृतीचा संकल्प केला. याप्रसंगी किडनी विकार तज्ज्ञ डॉ. सिद्धार्थ विनोद लखानी आणि नेत्रतज्ज्ञ डॉ. देवांशी बी. लखानी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना किडनीचे आरोग्य आणि त्याचा शरीराच्या इतर अवयवांवर होणारा परिणाम यावर अत्यंत मोलाची माहिती दिली. "लोकांची काळजी आणि पृथ्वीचे रक्षण" (Caring for People, Protecting the Planet) हे ब्रीदवाक्य समोर ठेवून राबवण्यात आलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. मुंबईकरांचे आरोग्य सुरक्षित राहावे आणि किडनी विकारांबाबत जनसामान्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी, यासाठी अशा व्यासपीठांची आज मोठी गरज आहे. आपण सर्वांनी आपल्या जीवनशैलीत सकारात्मक बदल करून, पुरेसे पाणी पिऊन आणि नियमित वैद्यकीय तपासणी करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन मी या निमित्ताने करते. यावेळी माझ्यासह नगरसेवक श्री. धर्मेश गिरी जी, नगरसेविका सौ. राखीताई जाधव उपस्थित होत्या. निकोप आणि सशक्त मुंबई घडवण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करूया. #WorldKidneyDay #LakhaniKidneyCare #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @ShelarAshish @MPLodha @JadhavRakhee @mybmc
Ritu Tawde tweet mediaRitu Tawde tweet mediaRitu Tawde tweet mediaRitu Tawde tweet media
MR
1
1
8
477
Mayor of Mumbai retweetledi
Ritu Tawde
Ritu Tawde@TawdeRitu·
दि. १२ मार्च २०२६ आज टाटा थिएटर, एनसीपीए (NCPA) येथे अदानी इलेक्ट्रिसिटी आणि अदानी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'स्वाभिमान - दी राईज ऑफ SHE' या अत्यंत प्रेरणादायी कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग आला. हा सोहळा केवळ एका उपक्रमाचा भाग नव्हता, तर आपल्या भगिनींच्या जिद्दीचा, कष्टाचा आणि स्वावलंबनाच्या प्रवासाचा खऱ्या अर्थाने सन्मान होता. याप्रसंगी महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, अदानी फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्रीती अदानी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 'स्वाभिमान' हा केवळ एक उपक्रम नसून तो प्रत्येक महिलेच्या आत्मविश्वासाचा प्रवास आहे. आपल्या मुंबईतील जास्तीत जास्त महिला अशाच प्रकारे स्वावलंबी होवोत आणि त्यांच्या सामर्थ्याने आपल्या महानगराचा विकास अधिक बळकट होवो, हीच सदिच्छा! #adanifoundation #Swabhimaan #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika #bmc #bjp4mumbai @BJP4Maharashtra @BJP4India @iAditiTatkare @AdaniPriti @AdaniFoundation @mybmc
Ritu Tawde tweet mediaRitu Tawde tweet mediaRitu Tawde tweet mediaRitu Tawde tweet media
MR
1
5
15
672