PMC Care
114.4K posts

PMC Care
@PMCPune
Official Twitter Account of Pune Municipal Corporation | पुणे महानगरपालिकेचे अधिकृत ट्विटर खाते

















पुणे शहर परिसरातील रस्त्यांवरील चेंबर्स समपातळीत करणे, फुटपाथ दुरुस्ती करणे इत्यादी कामाबाबत दि.२०.०३.२०२६ रोजी मा. महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम, यांचेमार्फत बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीसाठी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) श्री. ओमप्रकाश दिवटे, मा. शहर अभियंता श्री. अनिरुद्ध पावसकर, मा. मुख्य अभियंता (विद्युत)श्रीमती मनीषा शेकटकर, मा. मुख्य अभियंता (पथ) श्री. राजेश बनकर, मा. अधीक्षक अभियंता(पथ) अशित जाधव, मा. श्री. बांबळे तसेच पथ व विद्युत विभागाकडील अभियंते व संबंधित अधिकारी उपस्थित होते. पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागामार्फत रस्त्यावरील खड्ड्यांच्या अनुषंगाने मा.उच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज संस्थाना दिलेल्या निर्देशांनुसार रस्ते खड्डे मुक्त अभियान पुणे महानगरपालिकेने सुरु केले आहे. पुणे शहरात मध्यंतरी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या मार्गावर २ हजार सर्व प्रकारचे चेंबर्स झाकणे रस्त्याच्या समपातळीत आणून मार्ग व्यवस्थित करण्यात आला आहे. आगामी काळात तातडीने उर्वरित पावसाळी पाण्याच्या जलवाहिन्या आणि ड्रेनेजची झाकणे समपातळीत आणून मार्ग व्यवस्थित करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #Footpath #PotHoleFreePuneCity #PMCRoads #PMCCare #punemunicipalcommissioner











@Nishi2874 Sir/Madam, We have registered your complaint. Your complaint token number is T66584. You can check the current status of your complaint at: complaint.pmc.gov.in Thank you.






























