
Kishor
10.9K posts










आर्थिक दुर्बल -ईडब्ल्युएसच्या आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारामुळे राज्य सरकारने उच्च न्यायालयात प्रभावी बाजू मांडली. त्यामुळे उच्च न्यायालयाने आर्थिक दुर्बल घटकांचे आरक्षण मान्य केल्याने मराठा समाजासह अन्य विविध भरती प्रक्रियांमध्ये रखडलेल्या शेकडो उमेदवारांचा भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर या उमेदवारांनी आज मुख्यमंत्री @mieknathshinde यांची ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आभार मानले.














लातूर जिल्ह्यातील भाजपचे आमदार #अभिमन्यु_पवार नेहमी स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या मागण्या फडणवीसांकडे मांडताना दिसले आहेत. परंतु जेव्हा पण पेपरफुटी किंवा गैरप्रकार होतो तिथं अभिमन्यु पवार सोयीस्करपणे बोलायचं टाळतात. आता तर त्यांच्या लातूर जिल्ह्यातच PWD चा पेपर फुटल्याचा आरोप होतोय, विद्यार्थांची अपेक्षा आहे की जर गैरप्रकार झाला असेल तर ते केंद्र बाद करून, तपासाअंती गुन्हे दाखल करण्यास आमदारांनी पुढाकार घ्यावा. तसेच राज्याचे गृहमंत्री #फडणवीस पेपरफुटी रोकन्यास असमर्थ ठरले आहेत, त्यांना गृह खाते झेपत नसल्यास तत्काळ राजीनामा द्यावा. @AbhiPawarBJP @Dev_Fadnavis

