Manoj B Chavan waterman

911 posts

Manoj B Chavan waterman banner
Manoj B Chavan waterman

Manoj B Chavan waterman

@ManojBChavan5

SAMARTHA SOLITIONS trustee. matoshree trust MACCIA EXE. MEMBER RNS FACILITIES PVT LTD SVA TURNKEY PROJECT https://t.co/36uwCAQXDQ

Mumbai, India Katılım Haziran 2021
174 Takip Edilen2.7K Takipçiler
Manoj B Chavan waterman
Manoj B Chavan waterman@ManojBChavan5·
संपूर्ण देशात घरं बरबाद करणाऱ्या मटक्याचा आकडा कधी लीक झालेला ऐकलं नाही पण NEET परीक्षाचा पेपर मात्र लीक होतो. बेईमानीचा धंदा करणारे इतके ईमानी आणी इमानदारी चा पेशा चालवणारे इतके बेईमान कसे काय असू शकतात ना.@mnsadhikrut
MR
0
0
2
40
Manoj B Chavan waterman
Manoj B Chavan waterman@ManojBChavan5·
लोकांच्या प्रेमाच्या मताधिक्यने निवडून येणारा एक द्रष्टा आणी जननेता फक्त एका विधानपरिषद आमदारकी साठी स्वतःचे घर सोडून सेनेत येतोय. राजकीय अधोगती म्हणतात ती हिच का? जय कडू साहेब @mnsadhikrut
MR
0
0
4
94
Manoj B Chavan waterman
Manoj B Chavan waterman@ManojBChavan5·
माननीय कृषी मंत्री महोदय एखादा फेरफटका कोकणात देखील करावा आपण. तिथे देखील शेतकरी आहेत तिथे देखील अवकाळी ने आंबा काजू फणस रतांबे जांभूळ इत्यादी चे नुकसान केले आहे. आपण संपूर्ण राज्याचे कृषी मंत्री आहेत हे लक्षात असू द्यावं.@Dev_Fadnavis @mnsadhikrut @bharanemamaNCP @mieknathshinde
Manoj B Chavan waterman tweet media
MR
0
0
4
75
Manoj B Chavan waterman
Manoj B Chavan waterman@ManojBChavan5·
खाजगी रुग्णालय ही लुटण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे का? त्या लूटमारीचा सरकार कानाडोळा का करत आहे?यावर तोडगा नसेल निघत तर सरकार असमर्थ आहे अस तरी जाहीर करा...@mnsadhikrut @mieknathshinde @healthminister8 @abitkar_prakash @mnsreport9
MR
0
1
5
71
Manoj B Chavan waterman retweetledi
Arvind Sawant
Arvind Sawant@AGSawant·
कामगारांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या कायद्याचा तीव्र निषेध! कायमस्वरुपी नोकऱ्या संपवून कंत्राटी (Contractual) पद्धतीवर आलेल्या नोकर्‍यांमुळे आपला प्रवास 'शाश्वततेकडून अशाश्वततेकडे' सुरू झाला आहे. सरकारने आणलेल्या या नवीन कायद्यांमुळे सामान्य मजूर आणि कामगार पूर्णपणे असुरक्षित झाला आहे. आज लोकसभेत 'द इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड (सुधारणा) विधेयक २०२६' वर बोलताना मांडलेले मुख्य मुद्दे: ✅ असुरक्षित भविष्य: कंत्राटी पद्धतीमुळे कामगारांना स्थैर्य मिळत नाही, बँकांकडून गृहकर्ज मिळत नाही, परिणामी त्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न भंगते. ✅ खाजगीकरणाचा विळखा: MTNL, बँका, इन्शुरन्स इत्यादी क्षेत्रातील खाजगीकरणामुळे रोजगाराच्या संधी कमी होत आहेत. ✅ अनियंत्रित अधिकार: ३०० पेक्षा कमी कामगार असलेल्या कंपन्यांना आता सरकारची परवानगी न घेता उद्योग बंद करण्याची मुभा देण्यात आली आहे, ज्यामुळे कामगार रस्त्यावर येईल. ✅ हक्कांची पायमल्ली: ट्रेड युनियनचे अधिकार आणि संप करण्याच्या अधिकारावर गदा आणली जात आहे. सरकारने अंतर्मुख होऊ विचार करावा. कामगारांच्या भविष्याशी खेळणारा हा कायदा सरकारने त्वरित मागे घ्यावा, हीच आमची मागणी! - खासदार अरविंद सावंत नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) #ArvindSawant #ShivsenaUBT @OfficeofUT @AUThackeray @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
MR
5
36
123
2.7K
Manoj B Chavan waterman retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी, भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी वेळेस आंदोलन करणे हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले होते, त्यातले काही हजर देखील होते ! परंतु मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती ! नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या ! असो . . . मुळात भाषावार प्रांतरचना या देशात का करावी लागली हा इतिहास भागवतांना निश्चितच माहीत असावा असे आम्ही समजतो ! भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा जर भागवतांना आजार वाटत असेल तर त्यांच्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की हा आजार या देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये आहे. दक्षिणेत कर्नाटक ते तामिळनाडू इथे तीव्र भाषिक आणि प्रांतिक अस्मिता आहेत. तिकडे पश्चिम बंगाल असो, पंजाब असो अगदी गुजरात असो​, तिकडे पण ही भावना आहे. ही भावना नक्की काय आहे हे कधी भागवतांनी समजून घेतली आहे का? जेंव्हा देशातील ४ / ५ राज्यातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी वेगवेगळ्या राज्यात जातात, तिकडे आगाऊपणा करतात, तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारून, तिथल्या भाषेचा अपमान करतात, स्वतःचे मतदारसंघ तयार करतात​, तेंव्हा स्थानिकांच्यात रोष तयार होतो आणि त्यातून उद्रेक तयार होतो. याला तुम्ही आजार म्हणणार? आणि जर तुमच्या लेखी हा आजार असेल तर तो आजार आपल्या गुजरातमध्ये पण पसरला आहे. गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या हजारो लोकांना जेंव्हा पळवून लावलं तेंव्हा तिकडे जाऊन समरसतेचे धडे का नाही दिलेत? असेच धडे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश ते पंजाब ते पश्चिम बंगाल इथे जाऊन का नाही दिलेत ? मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबित कण्याचे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होते. काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर भय्याजी जोशींनी मुंबईची भाषा ही फक्त मराठी नाही तर ती गुजराती पण आहे अशा आशयाचं विधान करत मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करून अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा कसा होईल हे पाहिलं. मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भानगडीत मुळात पडायचंच कशाला? संघाच्या कामाबद्दल आमच्या मनात आदर आहे, पण म्हणून अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नये. आणि पडायचंच असेल तर देशभरात हिंदी (जी मुळात राष्ट्रभाषा नाही ) लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा. आणि यात हिंदुत्व आणून आम्हाला ज्ञानामृत पाजायचा प्रयत्न करू नका. मी अनेकदा सांगितलं आहे की ज्या वेळेस हिंदूंवर हल्ला होईल तेंव्हा आम्ही हिंदू म्हणून आमच्याकडून जे काही करणं शक्य होईल ते आम्ही करूच ! रझा अकादमीच्या दंगलीविरोधात मोर्चा काढणारा आणि मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करणारा​, तसेच हिंदू सणांच्या वेळी मोठमोठ्याने लाऊडस्पीकर लावणे आणि मोठमोठ्याने डिजे लावून नागरिकांना त्रास होत असताना त्या विरोधात भूमिका घेणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पक्ष होता. जे चूक ते चूकच हे आम्ही ठासून बोलतो. तसं मोहनराव आपण कधी बोलणार ? हिंदुत्वाच्या नावाखाली देशभरात जो धिंगाणा सुरु आहे , उत्तर भारतात कावड यात्रांमधे बिभत्स पद्धतीने महिलांना नाचवले जाणे , तसेच २०१४ ला बीफ एक्सपोर्ट मधे जो आपला देश ९ व्या क्रमांकावर होता तो आज दुसऱ्या क्रमांकावर आलाय आणि आपल्या देशात गोहत्येचं राजकारण करून जो तमाशा सुरू आहे आणि त्यातून माथी भडकवली जात आहेत त्यावर तुम्ही कधी बोलणार? त्या व्यापाऱ्यांच्या विरोधात सरकारला खडे बोल कधी सुनावणार? असो. तुम्ही काय करावं हे तुमच्यापाशी. आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हे अंतिम सर्वोच्च प्राधान्य आहे. या देशात भाषिक आणि प्रांतिक अस्मिता या राहणारच, तशाच त्या महाराष्ट्रात देखील राहणारंच ! हे आमचं स्वत्व आहे आणि त्याबद्दल जेव्हा जेव्हा असे प्रसंग उभे राहतील तेव्हा तेव्हा महाराष्ट्र त्वेषाने उभा राहील ! राज ठाकरे ।
MR
418
1.4K
6.2K
337.4K
Manoj B Chavan waterman
Manoj B Chavan waterman@ManojBChavan5·
मुंबईच्या महापौर निवडीची चर्चा कुठे तर दिल्लीत मराठीच माणसाच्या मुंबईच्या प्रथम नागरिक दिल्लीत ठरणार काय शोकांतिका आहे.या आधी अशी स्थिती कधी झाली नव्हती यावरून स्पष्ट होते महायुतीच्या राज्यातील नेत्यांचे वजन काय आहे…" दिल्ली चे आमिष मिळाले पंतना बदल्यात मराठी आणली अंताला"
MR
3
27
169
5.5K