PuneNGOsForum retweetledi

हिंजवडी, माण-मारुंजी या भागातील ‘राजीव गांधी इन्फोटेक पार्क’ आणि परिसरात रस्ते, पाणी, वीज यांसह इतर पायाभूत सुविधांच्या दृष्टीने गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. या भागासह जांभे, गहुंजे, नांदे, लवळे, पिरंगुट, भुकुम आणि लगतच्या जलद शहरीकरण होत असलेल्या भागांसाठी एक स्वतंत्र प्रशासकीय संस्था स्थापान करावी. यामुळे एकात्मिक नियोजन, निधी व्यवस्था आणि सेवा पुरवठा यासाठी स्वायत्तता सुनिश्चित होईल. परिणामी नागरिकांना आपल्या अडीअडचणींबाबत पाठपुरावा करणे सोपे होईल, अशी मागणी मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे. याबाबत निर्णय होईपर्यंत शासकीय आस्थपनांशी समन्वय साधण्यासाठी एक सक्षम नोडल अधिकारी नेमण्याची आवश्यकता आहे. यामुळे नागरीक आपल्या अडीअडचणींबाबत पाठपुरावा करु शकतील आणि त्यांना होणारा त्रास थांबेल. तरी माझी राज्याचे मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांना विनंती आहे की कृपया याबाबत आपण गांभीर्याने विचार करुन निर्णय घ्यावा.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @samant_uday

MR


































