Arnav Pathak
150 posts





































मृद व जलसंधारण विभागाच्या प्रलंबित आकृतीबंधाबाबत आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना आकृतीबंधाचा शासन निर्णय तात्काळ काढण्याचे स्पष्ट निर्देश दिले. ० ते ६०० हेक्टर या लघुसिंचन प्रकल्पांना गती मिळावी यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. या निर्णयामुळे नवीन क्षेत्रीय कार्यालयांची स्थापना होईल, तसेच नोकरभरतीच्या प्रक्रिया राबवण्यात येतील. यामुळे राज्यातील अनेक बेरोजगार तरुणांना शासकीय नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. @Dev_Fadnavis @mieknathshinde @Shivsenaofc

अभिनंदन, श्री. महेश राहाणे 💐💐💐 पहिली ते इंजिनिअरिंगपर्यंतचे असे सर्व शिक्षण आपल्या संस्थेत पूर्ण केलेले माजी विद्यार्थी महेश नामदेव राहाणे यांनी आज माझी सदिच्छा भेट घेतली. २००८ मध्ये सहाय्यक अभियंता म्हणून महापारेषण कंपनीत रुजू झाल्यानंतर आता महापारेषणमध्येच अतिरिक्त कार्यकारी अभियंता या पदावर बाभळेश्वर येथील ४०० केव्ही केंद्रात कार्यरत आहेत. महापारेषणमधील सरळ सेवा भरती परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करून संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांकाने कार्यकारी अभियंता या पदावर निवड झाल्याचा निश्चितच अभिमान आहे. सदर यशाची पावती म्हणून महापारेषण कंपनीने स्टेट ट्रान्समिशन युटिलिटी (STU), कॉर्पोरेट ऑफिस, मुंबई येथे पदस्थापना झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.




