

sanket jadhav
229 posts













@mybmc रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) सरळसेवा भरती परीक्षे साठी सुमारे 3200 महिला उमेदवारांना सुद्धा लांबची remote Centers देण्यात आली आहेत असे समजते @Dev_Fadnavis जी ₹1000/- भरून जिथे साधं टॉयलेट नाही! महिला सुरक्षेबाबत काय???? याची सर्वस्वी जबाबदारी मुंबई महानगर पालिका प्रशासन, IBPS व @MahaPolice यांची असेल @mieknathshinde साहेब 20% मुल मुलीनां 250 km कमीत कमी प्रवासासाठी शनिवारी रात्री मुक्कामाला यावं लागेल. परीक्षा रविवारीच संध्याकाळी 4 ते 7 म्हणजेच रविवार मुक्काम! सोबत आईवडील किंवा भाऊ असं कमीत कमी ₹6000/- खर्च??? साहेब मुलीनी आज नांदेड मध्ये आपणास सविस्तर माहीती दिलीत त्यामुळं आपणा सर्वांना कळकळीची विनंती खाजगी बदनाम केंद्रांवर गैरप्रकार टाळण्यासाठी TCS ION Digital Centers वरच परीक्षा घ्यावी अन्यथा गोरगरीब पोरं खचून जातील म्हणून @mybmc अजून वेळ आहे!उगाच अट्टहास करू नका! खाजगी केंद्रांवर आत काय होईल कोणालाच समजणारच नाही! पोलीसांनाही कारण ते केंद्रां बाहेर असतात! म्हणून मायबापा हो TCS ION Digital Centers घ्या! तमाम गोरगरिबांच्या लेकरांन साठी @iambadasdanve जी आपण आज स्वतः आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिलं त्याबद्दल आभार व धन्यवाद! @RRPSpeaks @Awhadspeaks आपलेही आभार!! सहकार्याच्या अपेक्षेत!!!

मा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य विषय : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC SE/JE) सरळसेवा भरती २०२४ परीक्षा शासन अधिकृत TCS iON च्या अधिकृत सेंटरवर घेण्याचे आदेश मा. आयुक्तांना देण्याबाबत. महोदय, गेले अनेक दिवस राज्यातील लाखो परीक्षार्थी अभियंते, विविध संघटना व त्यांचे पदाधिकारी बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या अधिकार्यांना सांविधानिक मार्गाने विनंत्या आणि पत्रव्यवहार करुन पूर्वी घोटाळा झालेल्या खाजगी परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेऊ नका, पुन्हा घोटाळा होऊ शकतो विनंती करत आहेत. अनेक जणांनी मा. आयुक्त, मंत्री, पालक मंत्री यांना याबाबत पत्रे पाठवली आहेत. आज नगर विकास मंत्री तथा शहराचे पालक मंत्री मा. एकनाथ शिंदे, मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मा. आशिष शेलार, विधान परिषद विरोधी पक्षनेते मा. अंबादास दानवे यांना देखील विद्यार्थ्यांच्या मागणीचे निवेदन देण्यात आहे. मा. आशिष शेलार यांनी मा. आयुक्तांना याबाबत सूचना दिल्या आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मा. अंबादास दानवे यांनी आज आयुक्त मा. भूषण गगराणी यांची भेट देऊन याबाबत निवेदन देखील दिले आहे. पहिल्या टप्प्यातील परीक्षा रविवार ९ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित केली आहे त्यामुळे मा. आयुक्तांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीचा विचार करुन उद्या निर्णय घेणे गरजेचे आहे. अनेक वर्षानंतर ही भरती होत असल्यामुळे वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या राज्यातील लाखो अभियंत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु या अगोदर भ्रष्टाचार झालेल्या खाजगी परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार असल्यामुळे लाखो विद्यार्थी मानसिक दृष्ट्या खचले आहेत. शासनावर नाराज झाले आहेत. महानगर पालिका या अगोदर परीक्षेत गडबड झालेल्या खाजगी परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेऊन काय साध्य करू इच्छीत आहे? खाजगी परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेऊन आगामी परीक्षा घोटाळा करण्याचे नियोजन आहे का? असे असंख्य प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत आहेत. आपण राज्याचे प्रमुख आहात. गेल्या ११ वर्षांतील आपल्या गृहमंत्री पदाचा कार्यकाळ महा पोर्टल घोटाळा, तलाठी, म्हाडा, वनविभाग, मृदा व जलसंधारण विभाग, पोलीस आदी विभागांतील परीक्षा घोटाळ्यांमुळे गाजला होता. आपल्या नवीन सरकारच्या कार्यकाळाची सुरुवात परीक्षा घोटाळ्यांनी होऊ नये ही अपेक्षा. कृपया आपण स्वतः यात लक्ष घालून मा. आयुक्तांना, या अगोदर परिक्षेत भ्रष्टाचार झालेल्या खाजगी परिक्षा केंद्रांवरील परीक्षा रद्द करुन फक्त शासनाने अधिकृत केलेली TCS ION या संस्थेच्या केंद्रांवर परीक्षा घेण्याचे आदेश देऊन लाखो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद, @ArvindKejriwal @Dev_Fadnavis @iambadasdanve @mieknathshinde @AjitPawarSpeaks @AUThackeray #BMC_JE #BMC_SE #TCS_ION_Digital #MCGM #BMC_At_TCS_Ion_Centre #BMC_atION_Centre #BMC_iONexamसेंटरचद्या














युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार श्री. आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार मुंबई महानगरपालिकेतर्फे कनिष्ठ अभियंता व उप अभियंता या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा या अधिकृत केंद्रांवर आणि निःपक्षपातीपणे घेण्यात याव्यात, या मागणीसाठी आज शिवसेना नेते, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ह्यांनी मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, माजी नगरसेवक सचिन पडवळ, इंजिनिअरिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष रमेश देशमुख, युवासेना सहसचिव धर्मराज दानवे उपस्थित होते. मुंबई महानगरपालिकेतर्फे कनिष्ठ अभियंता व उप अभियंता या पदांसाठी दिनांक ९ फेब्रुवारी, २०२५ रोजी ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र तलाठी व इतर पेपर फुटी झाली त्याच एजन्सीला हे काम दिले गेले आहे. या परीक्षा अधिकृत केंद्रांवर आणि निःपक्षपातीपणे घेण्यात याव्यात, या मागणीसाठी आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेत या विषयावर चर्चा केली. तसेच या भेटीत मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, मुंबई पब्लिक स्कुलमधील शिक्षकांची रिक्त पदे आवश्यकतेनुसार तातडीने भरण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.







