मराठी प्रवाशाला हिंदीची जबरदस्ती
मराठी नव्हे हिंदीत बोला यावरून सुरू झाला वाद,
महाराष्ट्रात विमानतळावर मराठी नव्हे हिंदीत बोला म्हणून कर्मचाऱ्यांकडून जबरदस्ती.
प्रवाशाने विचारला जाब,
पैसे घेऊन सुद्धा ग्राहकाचा/प्रवाशांचा अपमान केला जातो, भाषिक अडचण निर्माण केली जातेय. मराठी भाषिकांना दुय्यम वागणूक? मराठी भारतीय नाहीत का? @AAI_Official@AmitShah
विमानतळावर तरी मराठी माणसांना नोकऱ्या हव्यात.
@mohol_murlidhar@Dev_Fadnavis@mieknathshinde@DrSEShinde
#मराठीएकीकरणसमिती
@pdeeps2000@oradlaski@CSMIA_Official बरोबर आहे, अमेरिका पासून इराण पर्यंत सर्व विमानतळावर हिंदीच बोलली जाते. चीन, युरोप, जपान मध्ये तर हिंदी येत नसेल तर नोकरी मिळत नाही. जगात, भारतात, महाराष्ट्रात सर्व समजणारी एकमेव भाषा हिंदी आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी जगात कोणत्याही कोपऱ्यात असले तरी हिंदीच बोललं पाहिजे.
@oradlaski@CSMIA_Official म्हणजे, जेव्हा तुम्ही सुरत विमानतळावर जाता तेव्हा फक्त गुजराती बोलता का?, जेव्हा तुम्ही हैदराबादला जाता तेव्हा फक्त तेलगू बोलता का? आणि जेव्हा तुम्ही बंगळूरला जाता तेव्हा फक्त कन्नड बोलता ? मग हे मराठी लोक फक्त मराठीतच बोलण्याचा इतका हक्क का दाखवतात? 🤦♀️🤦♀️🤦♀️🤦♀️🤦♀️🤦♀️
If they don’t speak Marathi, they need to kick out of Maharashtra. @CSMIA_Official should deploy Marathi + English speaking staff to serve.
Hindi arrogance must be deported back to Bimaru state.
मराठी पर्याय निवडून पण जर अडचण सोडवायची असेल तर हिंदी पर्याय निवडा असं सांगण्यात आलं. निर्लज्ज ग्राहक प्रतिनिधीने हे लेखी सुद्धा दिल आहे. #म #StopHindiImposition #महाराष्ट्रात_मराठीच
मराठी नहीं बोलोगे तो थप्पड़’ जैसी भूमिका महाराष्ट्र की संस्कृति को शोभा नहीं देती। अजान हो या कोई भी धार्मिक विषय अगर किसी को उससे असुविधा होती है तो उसका समाधान कानून के दायरे में और संवाद के माध्यम से निकाला जा सकता है; लेकिन उससे समाज में विवाद खड़ा करना उचित नहीं है। मुंबई देश की आर्थिक राजधानी सिर्फ मराठी लोगों की मेहनत से ही नहीं बनी, बल्कि देशभर से आए व्यापारियों, कामगारों और उद्यमियों के योगदान से भी बनी है। यदि धमकी और आक्रामक भाषा का इस्तेमाल किया जाएगा, तो व्यापारी और निवेशक दूर हो जाएंगे और इसका नुकसान महाराष्ट्र को ही उठाना पड़ेगा।
राज ठाकरे की सभाएँ बड़ी होती हैं, उनका भाषण प्रभावशाली होता है लेकिन प्रभावशाली शब्दों से अधिक महत्वपूर्ण समाज को साथ लेकर चलने वाली भूमिका होती है। मराठी भाषा से प्रेम होना स्वाभाविक है, हमारे मन में भी है; पर भारत विविध भाषाओं का देश है। किसी एक भाषा के नाम पर दूसरी के खिलाफ द्वेष फैलाना महाराष्ट्र की समतावादी परंपरा के अनुरूप नहीं है। स्वाभिमान का अर्थ दूसरों का अपमान नहीं, बल्कि अपनी पहचान को बनाए रखते हुए सबको साथ लेकर आगे बढ़ना है।
आज मराठी भाषा गौरव दिवस. सर्वप्रथम सर्व मराठी भाषिकांना आणि जे मराठी भाषिक नाहीत पण जे मराठी भाषेचा इथे राहून आदर करतात आणि बोलतात किंवा बोलायचा प्रयत्न करतात त्यांना देखील मनःपूर्वक शुभेच्छा.
आजच्या दिवसाची ही पोस्ट लिहिताना गेले काही दिवस सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता याबद्दल जी चर्चा सुरु आहे, त्याचे संदर्भ आहेत. त्यात दिल्लीत एआय परिषद झाली त्या सगळ्याचे संदर्भ पण डोक्यात घोळत होते.
त्यातच अँथ्रोपिकच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीने जगभरात जी घुसळण सुरु केली आहे. त्या अँथ्रोपिकचा मुख्य तंत्रज्ञान अधिकारी श्री. राहुल पाटील ही मराठी व्यक्ती आहे ही पण बाब महत्वाची होतीच .
या निमित्ताने कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातील लोकांशी चर्चा केली, त्यांचं म्हणणं समजवून घेतलं आणि त्यातून जे जाणवलं ते आज मराठी भाषा गौरव दिवसाच्या निमित्ताने मांडत आहे.
आज फक्त मराठीच नाही तर जगातील सगळ्याच स्थानिक भाषा ज्यांना स्वतःची लिपी आहे अशा सगळ्यांसाठी एक खूप मोठी संधी आहे.
मध्यंतरी मला काही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रणाली दाखवल्या. त्या बघितल्यावर एक लक्षात आलं ते म्हणजे आता ज्ञान मिळवायला किंवा व्यक्त व्हायला किंवा अर्थार्जन करायला या प्रणालींचा हवा तसा वापर करणं शक्य आहे. आणि त्यासाठी तुम्हाला तुमची मातृभाषा उत्तम येत असेल तरी तुम्ही मागे पडू शकत नाही.
दहा हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागला आणि त्यानंतर जमीन ही मोठी शक्ती ठरली. औद्योगिक क्रांतीनंतर मशिन्स ही मोठी शक्ती वाटायला लागली. जसं डिजिटल युग सुरु झालं तसा डेटा शक्तिवान ठरला आणि आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात हा डेटा ज्या भाषांमधून तयार होईल त्या भाषा शक्तिशाली ठरतील.
आणि म्हणूनच माझे महाराष्ट्र सैनिक असोत की इतर मराठी जनांनी, मराठी भाषेतून अतिप्रचंड पण उत्तम दर्जाचा डेटा तयार होईल हे बघितलं पाहिजे.
यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात समाज माध्यमांवर मराठीमध्ये व्यक्त व्हा. तुम्ही ज्या क्षेत्रांत तज्ज्ञ असाल त्याचे मराठीत ब्लॉग्स सुरु करा, मराठी पॉडकास्टस सुरु करा. कम्प्युटरवर कोडिंग करण्यापासून ते मराठी भाषिकांनी सुरु केलेले डिजिटल विश्वकोश तयार होऊ देत. शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता विषय, ती प्रणाली कशी हाताळायची हे सगळं मराठीत मुलांना शिकवलं जावं. या सगळ्यातून मराठी भाषा ही डिजिटल जगातील ज्ञानाची वाहक बनेल आणि जितका मोठा डेटा (विदा ) या सगळ्या कृत्रिम बुद्धी प्रणालींना मिळेल तितकी ही सर्व सॉफ्टवेअर्स उत्कृष्ट संधी मराठीत उपलब्ध करून देतील.
आपण मराठी भाषा आणि मराठी प्रांत याच्या सार्वभौमत्वासाठी आवाज उठवत आलो आहोत, आता या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मराठी भाषेतून ज्ञान मिळ्वण्याबाबतचं सार्वभौमत्व मिळवणं शक्य आहे. ही संधी सोडू नका.
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेक नोकऱ्या कमी होतील अशी भीती सर्वत्र बोलली जात आहे. ती सार्थ असेल देखील. पण नक्की काय घडेल याचा अचूक अंदाज कोणीच व्यक्त करू शकत नाही. पण एक असं तंत्रज्ञान तुमच्या हातात आलं आहे जे आत्मसात केलं तर पारंपरिक उधोगधंद्यात काहीसा मागे पडलेला मराठी माणूस स्वतःच खूप मोठं साम्राज्य उभं करू शकेल. आज जगातील अनेक बलाढ्य कंपन्या या गेल्या २० /३० वर्षांत उभ्या राहिल्या आहेत आणि ते जी संपत्ती निर्माण करत आहेत ते १०० वर्ष जुन्या उद्योगसमूहांना पण शक्य होत नाही. त्यासाठी डिजिटल जगात मराठी मोठ्या प्रमाणावर उमटेल हे पहा. समाज माध्यमांवर मराठीत टीका, द्वेष पसरवण्यापेक्षा नवीन सकारात्मक माहिती टाका.
तुम्हा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा.
राज ठाकरे ।
अभिनंदन पुणेकर!
आपलं पुणे राहण्यासाठीच्या सर्वोत्तम शहरात देशात अव्वल ठरलं असून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शहरातील पायाभूत सुविधांचं जाळं भक्कम करण्याच्या प्रयत्नांचं हे मोठं यश आहे !
भारतीय जनता पार्टी पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या भक्कम साथीनं आणि मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासकामांचं हे पर्व निरंतर सुरू राहील, हा या निमित्ताने विश्वास देतो.
#Pune #पुणे
@narendramodi@PMOIndia@AmitShah@NitinNabin@blsanthosh@BJP4India@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@BJP4Maharashtra
@def__init__e By the grace of my ancestors and through my own hard work, I certainly have sufficient financial capacity to bear my expenses myself. I have no need for public money. If anyone thinks otherwise, they should prove it with facts instead of writing baseless things on social media.
@Shivsenaofc महायुती? @mieknathshinde शिंदे साहेब, लहान तोंडी मोठा घास घेतो, 2029 पर्यंत तीनही सेना एकत्र येतील ह्यासाठी प्रयत्न करा, तिघांनाही राजकारणात टिकून राहायचे असेल तर. बाकी तुम्ही सुज्ञ आहात..
ठाकरेंनी त्यांच्या सभेत हा नकाशा का दाखवला नसेल?
अदानीचे प्रकल्प दाखवले हरकत नाही मात्र धार्मिक आधारावर वक्फ ने गिळंकृत केलेली देशभरातील लाखो एकर जमिनीची ही आकडेवारी का दाखवली नाही.
मोदी सरकारने वक्फ बोर्डाच्या जमिनींवर आळा घालण्यासाठी कायदा आणला तेव्हा ठाकरे गटाच्या खासदारांनी संसदेत या कायद्याच्या विरोधात आणि वक्फ बोर्डाच्या समर्थनार्थ मतदान केलं होत.
हिपोक्रसी की भी सीमा होती है...
निवडणुकीपूर्वी...
- तुळजाभवानीसमोर वचननामा, पण, देवीदेवतांच्या अस्तित्त्वावर प्रश्नचिन्ह
- गंगेत लोक अंग खाजवतात, म्हणून गंगेचा अपमान
- भगवतगीता वाचायला जाडजूड, कोण वाचेल?
- एका मुस्लिमाने कुराण दिले, ते वाचणार
- रामायण टीव्हीवर बंद केले पाहिजे, हे निमूटपणे ऐकून घेणार
- गडकिल्ल्यावर मशिद बांधली पाहिजे, हेही निमूट ऐकून घेणार
- दहीहंडीऐवजी मटणहंडीला प्राधान्य देणार
- बुरखाधारी महापौरावर गप्प बसणार
आणि निवडणूक असताना मुंबादेवीच्या दर्शनाला तेही फुटेजसाठी जाणार...
उबाठाचा नवा मंत्रः
मेरे दो अनमोल रतन -
एक उमर, दुजा शर्जिल
‘भारत तेरे तुकडे होंगे ‘अशा घोषणा देणारा उमर खलिद व इथे महाराष्ट्रात येऊन हिंदूबद्दल अपशब्द वापरणारा शर्जिल इमाम हे ‘उबाठा’चे लाडके होते, हे तर वास्तव आहे.
ज्यावेळी अनेक राज्यांत शर्जिल इमाम चा शोध सुरू होता त्याच वेळी महाराष्ट्रात शर्जिल इमाम येतो, जाहीर प्रक्षोभक भाषण देतो, व आरामात परत जातो.. कारण मुख्यमंत्रीपदी उध्दव ठाकरे असतात. हे एकदा नाही, तर दोनदा घडते. शार्जिल इमाम प्रकरणात मोठा गदारोळ झाल्यानंतर जबाब घेण्यासाठी त्याला गुपचुप आणले जाते. त्याच्यावर कोणतीही जबरदस्तीने कारवाई करणार नाही असे पोलिस उच्च न्यायालयात सांगतात, कारण मुख्यमंत्री पदी उध्दव ठाकरे असतात.
उमर खलीद सोबत तर, युवराज आदित्य ठाकरे हे एकाच व्यासपीठावर येणार होते, छात्रभारतीने आयोजित केलेल्या सीएए विरोधी परिषदेला आदित्य ठाकरे उपस्थित रहाणार असल्याचे त्यांच्या छायाचित्रासह निमंत्रण पत्रिकेवरच नमूद होते. आदित्य ठाकरे यांच्या संमतीशिवाय ते शक्य झाले असते का?
या चूका नाही.
हा योगायोगही नाही.
ही जाणीवपूर्वक घेतलेली भूमिका आहे.
देशविरोधी विचारांशी जवळीक ठेवून
वरून राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाच्या गप्पा —
मुंबईकर आणि महाराष्ट्र हे ओळखून आहेत.
इतिहास आठवण करून देतोय,
आणि वास्तव स्वतःच बोलतंय.
#उबाठा
#देशविरोधीविचार
#शर्जिलइमाम
#उमरखलीद
#ढोंगीराजकारण
#UmarKhalid
#मुंबई
#महापालिका
मेस्सीने भारत दौऱ्याच्या शेअर केलेल्या व्हिडिओत फक्त एकच राजकीय व्यक्ती ठळकपणे दिसत आहे.
आणि ते आहेत देवेंद्र गंगाधरराव फडणवीस..!🔥
ही असते लायकी, इज्जत. जी कमवावी लागते..!
बाकी राहुल गांधी, रेवंथा रेड्डी यांना तर कचऱ्यासारखं बाजूला फेकलं आहे त्याने..!😹
@Dev_Fadnavis#Team_Devendra
वर्षानुवर्षे मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता गाजवणाऱ्या उबाठाकडून
मुंबईकरांना काय मिळालं?
▪️रस्ते नाहीत—खड्ड्यांचे जाळे
▪️नियोजन नाही—पावसात ठप्प होऊन थांबणारी मुंबई
▪️स्वच्छता नाही—नालेसफाईत कोट्यवधींचा भ्रष्टाचार
▪️व्यवस्था नाही—कचरा उचलण्यात दलाली
▪️आणि सर्वात महत्त्वाचं—
ना व्हिजन, ना धोरण, ना जबाबदारी!
मुंबईला आपल्या मर्जीनुसार चालवली गेली, आणि
मुंबई सहन करत राहिली.
दुसरीकडे—
देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व म्हणजे निर्णय, दिशा आणि डिलिव्हरी!
✔️ मेट्रोचे जाळे—मुंबईला वेग
✔️ वातानुकूलित लोकल—मुंबईकरांना सन्मान
✔️ कोस्टल रोड—कोंडीवर ठोस उपाय
✔️ बीडीडी चाळीतील मराठी माणसाला—हक्काचं स्वप्नवत घर
✔️ डब्बेवाला भवन—कष्टकऱ्यांच्या श्रमांचा गौरव
✔️ नवे विमानतळ—मुंबईचा जागतिक विस्तार
इथे फक्त घोषणा नव्हत्या,
इथे जमिनीवर उतरलेला विकास होता!
एकीकडे अपयशाची सवय,
दुसरीकडे कामगिरीची ओळख.
फरक स्पष्ट आहे—
भूतकाळ की भविष्य,
घराणेशाही की विकास,
मुंबईच ठरवेल! 🔥
@Dev_Fadnavis@RaviDdaChavan@AmeetSatam
#मुंबईकरांचासवाल
#मुंबईमहापालिका
#उबाठा_अपयशी
#ना_व्हिजन_ना_धोरण
#देवेंद्रफडणवीस
#विकासाचंनेतृत्व
#DecisionDirectionDelivery#MumbaiOnFastTrack
#विकासाचीओळख
@PrakashGade13 बरं १७०० अफवा आहे, मग खरा आकडा किती आहे ? झाड तोडणार नाहीत तर त्या बदल्यात गिरीष महाजन १५००० झाडे का लावणार आहे ? शासन दरबारी झुडपांची नोंद असते का? भाजपचे आहात म्हणून काहीही बरळत जाऊ नका
साधूग्रामच्या झाडांच्या कत्तीलीचे वास्तव!
साधूग्रामच्या नावावर झाडांची कत्तल होत आहे, पर्यावरणाचा नाश होत आहे, सरकार निर्दयी आहे, असा भस्मासुरासारखा आरडाओरडा काही जणांनी सोशल मीडियावर सुरू केला आहे. त्यांच्या पोस्ट पाहिल्या की एक गोष्ट स्पष्ट कळते त्यांना ना पर्यावरणाची माहिती आहे, ना तथ्यांची. त्यांना फक्त खोटे रंगवून सरकारविरोधी वातावरण तयार करायचं आहे. “१७०० झाडे कापली जात आहेत” असा आकडा ते सोयीस्कर पद्धतीने फेकतात, आणि लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पण इथंच त्यांचा खोटारडेपणा उघडा पडतो. कारण ज्याला ते “झाडांची कत्तल” म्हणतात, ते प्रत्यक्षात झाडेच नाहीत.
बहुसंख्य ठिकाणी जी झाडे तोडली जात आहेत म्हणून किंकाळ्या फोडल्या जातात, ती म्हणजे भाभळीची झुडपे आणि काही विदेशी झुडपे. होय, काटेरी, आक्रमक, जंगलाच्या जैवविविधतेचा शत्रू असलेली बाभळी. बाभळी ही झाडसुद्धा नाही; ती एक घुसखोर प्रजाती आहे जी पसरली तर संपूर्ण परिसंस्था नष्ट करते. म्हणूनच भाभळी निर्मूलन मोहिमा देशभरात राबवल्या जातात. आणि इथे तीच झुडपे हटवली जात असताना काही जण त्याला “झाडांची हत्या” म्हणतात, हे पाहून पर्यावरणानेच लाजून जमिनीत शिरावं इतकी अपप्रचाराची पातळी आहे.
साधूग्रामसाठी केलेल्या प्रारंभिक सर्व्हेत परिसरातील एकूण झुडपे, वेल, काटे, आणि काही झाडे यांची गणना करण्यात आली होती. पण हा आकडा म्हणजे कापण्याचा नाही, तर मोजणीचा. काही जणांनी या मोजणीला कत्तलीचा आकार देऊन मुद्दाम लोकांना चुकीची कल्पना दिली. वास्तविक राज्य सरकारने पहिल्या दिवसापासून स्पष्ट भूमिका घेतली होती झाडे न कापता, शक्य तिथे आराखडा बदलून, साधूग्राम उभारायचा. म्हणूनच, प्रकल्पाचे रीडिझाइन केले गेले, मार्ग बदलले गेले, निवास क्षेत्रांच्या रचना बदलल्या गेल्या. जर एखादे झाड हलवणे आवश्यक असेल तर त्याचे री प्लानटेशन करण्याची तयारी केली गेली. शिवाय प्रत्येक एका झाडासाठी १० झाडे लावण्याचा नियम कायम ठेवला आहे. म्हणजे पर्यावरणपूरकतेबाबत सरकारची निष्ठा स्पष्ट असताना, अपप्रचार करणाऱ्यांची हेतूपुरस्सर दिशाभूल मात्र त्याहूनही स्पष्ट होते.
याहून मजेशीर म्हणजे साधूग्राम हा कायमस्वरूपी प्रकल्प नाही. हा तात्पुरता धार्मिक इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प आहे जो कुंभमेळ्यासारख्या लाखो साधू महंत व भाविकांच्या आगमनासाठी उभारला जातो. कुंभमेळा एक महिना असतो, आणि ही व्यवस्था देखील तात्पुरतीच असते. कार्यक्रमानंतर बहुतेक जागा पुन्हा पूर्ववत केली जाते. झाडे तशीच राहतात, परिसर तसाच राहतो, निसर्ग तसाच श्वास घेतो. मग हा गदारोळ काय? हा गदारोळ त्या लोकांचा आहे ज्यांना विकास, व्यवस्थापन, सुरक्षितता, परंपरा कशातच रस नाही. त्यांना रस आहे तो केवळ राजकीय नफ्यात. आणि म्हणूनच ते काटेरी भाभळीलाही “मोठ्या झाडांची कत्तल” म्हणून विकतात.
पर्यावरण हा गंभीरच विषय आहे. पण त्याचा वापर ढोंग करण्यासाठी करणे ही मोठी ढोंगीपणाची खूण आहे. जे लोक हजारो झाडांवर उभे राहणारे कायमस्वरूपी मॉल्स, टॉवर्स, अवैध बांधकामे पाहूनही कधीच आवाज उठवत नाहीत, तेच लोक आज बाभळीच्या झुडपांवर अश्रुधारा ढाळत आहेत. हेच त्यांचं खोटं उघड करतं. कारण झाडे वाचवण्यासाठी जबाबदार शासन कार्यरत आहे, तर अपप्रचार पसरवणाऱ्यांचे एकमेव काम म्हणजे तथ्य दडवणे.
वास्तव हेच आहे की साधूग्रामसाठी झाडांची कत्तल नाही; झुडपांचे व्यवस्थापन आहे. जिथे आवश्यक आहे तिथे स्थलांतर आहे. जिथे काढावे लागेल तिथे पर्यायी लागवड आहे. आणि जिथे संरक्षण शक्य आहे तिथे पूर्ण संरक्षण आहे. सरकारने केलेल्या बदलांनी पर्यावरणाला कोणतीही कायमस्वरूपी हानी पोहोचणार नाही उलट परिसर अधिक नैसर्गिक आणि संतुलित राहील. पण अपप्रचार करणाऱ्यांना या एकाही गोष्टीचा संदर्भ नको. कारण सत्य सांगितलं तर त्यांच्या राजकीय दुकानाला कुलूप लागेल.
आज आवश्यक आहे सत्य सांगणे झाडे सुरक्षित आहेत. कापली जाणारी बहुसंख्य वस्तू ही झाडेदेखील नाहीत; ती भाभळीची व इतर आक्रमक झुडपे आहेत. साधूग्राम तात्पुरता, पर्यावरणपूरक आणि सुरक्षिततेला प्राधान्य देणारा निर्णय आहे. आणि त्याविरुद्ध चालवला जाणारा अपप्रचार हा झाडांसाठी नाही, तर निव्वळ खोटारडे राजकारणासाठी आहे. म्हणूनच आज एक गोष्ट स्पष्टपणे सांगावीच लागते झाडांची कत्तल होत नाही; खऱ्याची कत्तल होते आहे.
ज्यांना तथ्यांची चीड आहे त्यांना ही पोस्ट वाचून चीड येणार पण जे सत्याचा आदर करतात त्यांच्यासाठी ही माहिती आवश्यक आणि प्रामाणिक आहे. साधूग्रामचा प्रकल्प पुढे चालू राहील, व्यवस्थाही उभी राहील, साधू - महंतांसाठीची सुविधा पूर्ण होईल आणि पर्यावरण देखील तितक्याच सुरक्षिततेने वाचेल. पण या संपूर्ण प्रक्रियेत सर्वात मोठा पराभव होणार आहे तो एकाच गोष्टीचा खोट्यांचा.
@narendramodi डॉ. बाबा आढाव नेहमी स्मरणात राहतील. असंघटीत क्षेत्रातील लोकांना योग्य न्याय व उत्पन्नाची शास्वती मिळेल असे कायदे करणे हीच बाबा आढाव ह्यांना श्रद्धांजली ठरेल.
विविध सामाजिक कामांसाठी आयुष्य वाहून घेत समाजसेवा करणारे, विशेषतः वंचितांचे सबलीकरण आणि कामगार कल्याणासाठी लढणारे बाबा आढावजी, त्यांच्या या कार्यासाठी सदैव स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने अतिशय दुःख झाले आहे. त्यांचे कुटुंब आणि प्रशंसकांप्रति माझ्या संवेदना. ॐ शांती.